आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: तीन वर्षाच्या प्रदीर्घकाळानंतर रक्षाबंधन उत्साहात साजरे! कोरोना काळातील महामारीनंतर रक्षाबंधन पूर्ण भारत देशामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना देखील खासदार भावना गवळी यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. पंतप्रधानांनी लहान मुलांच्या सानिध्यात हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत अमृत महोत्सव रक्षाबंधन सादर केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी देखील महिला पोलिसांबरोबर रक्षाबंधन साजरे केले. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सुप्रिया सुळेंनी देखील अजित दादांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहीण भावांच्या या प्रेमळ नात्यांचा अविष्कार म्हणून रक्षाबंधन खूप उत्साहाने पार पडला.