Home जालना भारत – पाकिस्तान तणाव अनुषंगाने नागरिकांसाठी सूचना – जालना पोलीस

भारत – पाकिस्तान तणाव अनुषंगाने नागरिकांसाठी सूचना – जालना पोलीस

210

आशाताई बच्छाव

1001487020.jpg

  1. भारत – पाकिस्तान तणाव अनुषंगाने नागरिकांसाठी सूचना – जालना पोलीस

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सर्व नगरिकांना खालील मुद्यावर जालना पोलीस दलांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
भारत एक संघ आहे सर्वांनी भारत एक संघ असल्याची प्रचिती दाखवण्यासाठी एकजुटीने आपले देशाप्रतीचे कर्तव्यांचे पालन करावे.
अफवांवर विश्वास ठेवू नका . कोणतीही माहिती केवळ अधिकृत शासकीय स्तोत्रांकडून स्वीकारा.
सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार करू नका अफवा पसरवणे कायद्याने दंडनीय आहे.
पाकिस्तान मार्फत सायबर हल्लापासून बचाव करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी, समस्यास्पद लिंक वर क्लिक करू नये.
लष्करी,निम लष्करी दलांच्या हालचाली बाबत काहीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सोशल मीडियावर व इतरत्र माहिती प्रसारित करू नये.
स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा शाळा कार्यालय वाहतूक याबाबत बदल झाल्यास प्रशासन माहिती देईल.
कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस किंवा प्रशासनाशी त्वरित संपर्क साधा.
नागरिकांनी जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करावेत कोणतेही जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये.
भारत एक मजबूत आणि सजग देश आहे. नागरिकांनी शांतता राखावी संयम बाळगावा आणि देशाच्या सुरक्षेसाठी जागरूक राहावे.