Home वाशिम मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी उपोषणाला शंभर टक्के यश. आमदार अमित झनक यांच्या...

मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी उपोषणाला शंभर टक्के यश. आमदार अमित झनक यांच्या हस्ते उपोषण सोडले…

743

आशाताई बच्छाव

1001487007.jpg

मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी उपोषणाला शंभर टक्के यश.
आमदार अमित झनक यांच्या हस्ते उपोषण सोडले…

मालेगांव/: वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ- मुंगळा गावात अवैध दारू विक्रीने कहर केला असून दारूपायी अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे.नवीन पिढीतील मुले दारूच्या आहारी जात अनेक कुटुंबांचे घर उध्वस्त झाले असुन महिलाचा संयम आता संपत आला आहे. अनेक वर्षापासून अवैध देशी,गावठी दारू बंद करण्याच्या मागणीनंतरही अवैध देशी गावठी दारू खुलेआम विक्री सुरू आहे. दारू विक्रीवर आळा बसलेला नाही.यामुळे श्री संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंचचे संयोजक अनंता कुटे, व महिला मंडळी कडुन आज रोजी मालेगाव तहसील समोर उपोषण सुरू होते अखेर रिसोड मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या मध्यस्थीने लिंबू शरबत देऊन उपोषणाचा समारोप करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी साठी लढा उभारलेला आहे. साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कायमस्वरूपी दारू बंदी लढ्याला अखेर शंभर टक्के यश आले.मुंगळा गावातील शंभर टक्के दारू करण्यासाठी पोलीस व महसूल विभाग कटिबंध राहील,असे लेखी आश्वासन देऊन उपोषणाची माघार त्याच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडवण्यात आले. याप्रसंगी आमदार अमितभाऊ झनक यांनी मुंगळा गावावर बाबापासुन विशेष प्रेम आहे तोच वारसा जपत पुढे चालू ठेवणार आहे. तसेच मुंगळा येथील कायमस्वरूपी दारू बंदी करण्यात कोठेही कसुर करू नये.यावियाबाबत त्यांनी प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत. याप्रसंगी प्रशासनाने
दिलेला शब्द पाळुन गावच्या परिसरात कोठेही दारू विक्री झाली नाही पाहिजे अशी खबरदारी घ्यावी,कायमस्वरूपी दारूबंदी करीता समिती स्थापन करावी अशी प्रतिक्रिया श्रीसंत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंच मुंगळाचे संयोजक अनंता कुटे यांनी मांडली आहे.माता भगिनींच्या लढ्याला शंभर टक्के यश आले यामुळे सर्व गावकऱ्यांनी महिला मंडळीनी समाधान व्यक्त केले .
याप्रसंगी उपोषण मंडप स्थळी आ.अमितभाऊ झनक, मालेगाव तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी दीपक पुंडे, मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी, तालुका ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे, फुले शाहू आंबेडकर विचाराचे प्रवक्ते भाई गोवर्धन चोथमल,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती संदिप किसनराव घुगे,माजी सभापती सुरेश शिंदे, काँग्रेस शहरप्रमुख योगेश बळी,बबनराव गारडे, सखाराम आंबेकर,मुंगळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच डीगंबर पवार,माजी उपसरपंच गजानन केळे,समाजसेवक संतोष राऊत,कैलास राऊत,मनोहर आप्पा महाजन,मुख्य संपादक उज्वल मालेगाव व आमचे मार्गदर्शक अनिल बळी सर, पत्रकार किरण पखाले, संदीप सावले, गुडदे, कळमगव्हाण येथील पत्रकार सुनील इंगळे,प्रफुल्ल साठे (पत्रकार),अजिंक्य मेडशीकर (पत्रकार),संदिप इंगोले
(पत्रकार),चंद्रकांत गायकवाड
(पत्रकार),नागेश अवचार पत्रकार,मालेगाव येथील
सामाजिक कार्यकर्ते गणेश काटेकर,गणेश मोहळे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी,लक्ष्मीबाई घुगे, प्रयागबाई राऊत, विश्रांतीबाई जायभाये, सुनिता कुटे,कमलबाई राजेकर,जिजाबाई कदम, लक्ष्मीबाई वाघ,व इतर बहुसंख्य महिला व पुरुष मंडळी हजर होती.

Previous articleEXCLUSIVE – माऊली फाट्याजवळ भीषण अपघात; दोन बालकांचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परला लावली आग !
Next articleभारत – पाकिस्तान तणाव अनुषंगाने नागरिकांसाठी सूचना – जालना पोलीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.