Home उतर महाराष्ट्र आश्रयआशा फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी; आता उत्सुकता २५ एप्रिलची

आश्रयआशा फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी; आता उत्सुकता २५ एप्रिलची

138

Yuva maratha news

1003020590.jpg

आश्रयआशा फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी; आता उत्सुकता २५ एप्रिलची
मालेगाव प्रतिनिधी : आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ या भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आता सर्वांचे लक्ष २५ एप्रिल या दिवसाकडे लागले आहे. महाराष्ट्रभरातील मान्यवरांच्या स्वागतासाठी मालेगाव महानगर सज्ज झाले असल्याची माहिती पुरस्कार समितीचे आयोजक तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे यांनी दिली.
मालेगाव येथील हरिकेश लॉन्स बँक्वेट हॉल, दाभाडी रोड, दौलती शाळेजवळ हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून आदिवासी लोकसंस्कृती रक्षक यथार्थ चिंतामण देशमुख तसेच बाल नृत्यांगना कु. अनन्या चौरे यांचा पारंपरिक आदिवासी नृत्याविष्कार सादर होणार आहे. यासोबतच तलवारीबाजीचे थरारक प्रात्यक्षिकही मान्यवरांना पाहायला मिळणार आहे.
याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य रक्षणासाठी वापरण्यात आलेल्या दुर्मिळ शिवसाहित्य वस्तूंचे अनोखे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी भरविण्यात येणार असून, इतिहासप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या सोहळ्यास राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, धुळे, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक आदी जिल्ह्यांतील पुरस्कारार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या भव्य-दिव्य सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी आश्रयआशा फाऊंडेशन व युवा मराठा महासंघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे रामभाऊ आवारे यांनी सांगितले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या कार्यक्रमामुळे मालेगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous articleYuva-Maratha-29-March-2026-
Next articleYuva Maratha Epaper 19 April 2026
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.