Home नांदेड सुज्ञ समाज हीच देशाची संपत्ती- प्रा.विठ्ठल बरसमवाड

सुज्ञ समाज हीच देशाची संपत्ती- प्रा.विठ्ठल बरसमवाड

46

सुज्ञ समाज हीच देशाची संपत्ती- प्रा.विठ्ठल बरसमवाड

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
(छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगर येथे ७ जून रविवारी गोल्ला -गोलेवार यादव समाजाचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पुंडलिक नगर मधील तिरूमला मंगल कार्यालयात सायंकाळी चार वाजता पार पडला. समाजातून चारित्र्यवान व्यक्ती तयार व्हावे, त्यामुळे राष्ट्राची प्रगती होते. सुज्ञ समाजामुळे देश प्रगतीपथावर जातो.असे प्रतिपादन गोल्ला -गोलेवार यादव समाज मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक, साहित्यिक प्रा. विठ्ठल बरसमवाड यांनी केले .यावेळी छत्रपती संभाजी नगरचे महापौर समीर दादा राजूरकर व गोल्ला- गोलेवार यादव समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.नामदेवराव आयलवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक मा.श्री तुकाराम गालेवाड उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच अधिक मासाच्या निमित्ताने महिलांना भेटवस्तू देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजी नगरचे महापौर समीर दादा राजुरकर यांनी गोल्ला समाज हा कष्टाळू व प्रामाणिक आहे.असे गौरव उद्गार काढले. गोल्ला -गोलेवार यादव समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री नामदेवराव आयलवाड यांनी समाजाची पूर्वीची परिस्थिती व सद्य स्थिती यावर भाष्य केले आणि यापेक्षा पुढील वर्षी मोठे कार्यक्रम घ्यावेत. अशी अपेक्षा व्यक्त केली. तानाबाई शिक्षण संस्थेचे संस्थापक दिगंबरराव अंकमुळे यांनी समाजाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.या स्नेह मेळाव्यासाठी श्री गंगाधर राजमवाड, श्री रामदास कावटवाड, उच्च न्यायालयाचे आदरणीय ॲड,विश्वनाथ गोलेवार सुनील कोंडेवाड, अनिलकुमार संगमकर, श्रीनिवास उल्लेवार.ए,पी,आय स्नेहा करेवाड आणि शैक्षणिक ,सामाजिक , अध्यात्मिक ,व राजकीय क्षेत्रातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त तहसीलदार श्री नरसिंगराव झंपलवाड यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षिका सौ.रत्नमाला अंकमवार यांनी केले तर समारोप सेवानिवृत्त निवृत्त तहसीलदार गंगाधरराव आयनलवार यांनी केले.

Previous articleसुज्ञ समाज हीच देशाची संपत्ती- प्रा.विठ्ठल बरसमवाड
Next articleसुज्ञ समाज हीच देशाची संपत्ती- प्रा.विठ्ठल बरसमवाड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.