Home वाशिम एकांबा गावातील वार्ड ३ मध्ये गटारगंगा ———————————————नागरिकांचे आरोग्य धोक्यात ————————————— ग्रामसेवकाचे दुर्लक्ष—वार्ड...

एकांबा गावातील वार्ड ३ मध्ये गटारगंगा ———————————————नागरिकांचे आरोग्य धोक्यात ————————————— ग्रामसेवकाचे दुर्लक्ष—वार्ड ३ च्या नागरिकांचा आरोप ————————————— गटारामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता

160

आशाताई बच्छाव

1002130109.jpg

एकांबा गावातील वार्ड ३ मध्ये गटारगंगा
———————————————नागरिकांचे आरोग्य धोक्यात
—————————————
ग्रामसेवकाचे दुर्लक्ष—वार्ड ३ च्या नागरिकांचा आरोप
—————————————
गटारामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता
——————————————— अनसिंग /वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ—
——————
अनसिंग पासून जवळच असलेल्या एकांबा गावातील वार्ड ३ मध्ये मागील अनेक महिन्यापासून गटारगंगा साचली आहे.या गटारगंगेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.एकांबा गावातील वार्ड ३ मधील गटारगंगा त्वरीत बंद करुन गावातील सांडपाण्याची वरिष्ठांनी कायमस्वरूपी योजना करून या परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एकांबा गावामध्ये ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून तेथील ग्रामसेवक यांचेकडे सर्व अधिकार आहेत,गावातील वार्ड ३ मध्ये गावातील सांडपाणी साचल्यामुळे या भागात गटारगंगा निर्माण झाली आहे.या गटारगंगेचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा ग्रामसेवकाला प्रत्यक्ष भेटून सांगितले.परंतु संबंधित ग्रामसेवकाने अद्यापपर्यंत या गंभीरबाबीची दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वार्ड ३ मध्ये बहुतांश दलीत नागरिक राहतात.केंद्रशासन व राज्यशासन ग्रामविकासाच्या,आरोग्याच्या,
स्वच्छतेच्या,शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अनेक योजना राबविते.परंतु शासनाच्या “या” दोन्ही योजना एकांबा गावात आजपर्यंत पोहोचल्यात नाहीत का ? माजी पदाधिकारी व ग्रामसेवकाने कागदोपत्री विकास दाखवून स्वत:चा विकास केला ? असा सवालही नागरिकांकडून केल्या जात आहे.
एकांबा गावातील वार्ड ३ मधील गटारगंगा कायमस्वरुपी बंद करण्यासाठी जि.प.चे सिईओ,पंचायत समितीचे बीडीओ यांनीच पुढाकार घ्यावा.गावातील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
———————————