Home जालना राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात संपन्न वाशीम प्रथम तर नागपुर ग्रामीण दुसर्‍या...

राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात संपन्न वाशीम प्रथम तर नागपुर ग्रामीण दुसर्‍या स्थानावर

155

आशाताई बच्छाव

1002339532.jpg

राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात संपन्न
वाशीम प्रथम तर नागपुर ग्रामीण दुसर्‍या स्थानावर
जालना/प्रतिनीधी दिलीप बोंडे- महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या मान्यतेने जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने दिनांक 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे आयोजीत 38 व्या सब ज्युनीयर राज्यस्तरीय टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 प्रचंड प्रतिसादासह उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये 23 जिल्ह्यांचे मुलांचे 21 संघ तर मुलींचे 17 संघ सहभागी झाले होते. यातुनच केरळ येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला असुन त्यामध्ये नैतीक वर्मा (वाशीम), ललीत तिवारी (नागपुर शहर), तन्मय लावारवार (वाशीम), आराध्य गुंजाळ (अ.नगर), साहिल राठोड (वाशीम), समर्थ म्हस्के (जालना) यांची मुलांच्या संघात तर मुलींच्या संघात डिेंपल काळे (नागपुर ग्रामीण), अवंतीका कुर्लेकर (पुणे शहर), श्रद्धा बनसोड (नागपुर शहर), अबोली वासनीक (नागपुर शहर), अक्षरा ठाकरे (नागपुर ग्रामीण), प्रणाली फु लारी (जालना) यांची निवड करण्यात आलेली आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशचे महासचिव अनिल वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये जालनाचे जेष्ठ पत्रकार कैलास फु लारी, युनायटेड क्रिकेट असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. अमजद पठाण, महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा रेफ्र ी बोर्ड चेअरमन अ‍ॅड. मृणाल बांडेबुचे, कनव्हेनर लकी समुद्रे, तांत्रीक समीतीचे कृष्णा ठाकरे, आयोजन समीतीचे अध्यक्ष शेख अहेमद हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन स्पर्धेचे मुख्य आयोजक शेख चाँद पी.जे. यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनचे अध्यक्ष जयंत राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते.

Previous articleपोलीस नक्षल चकमकीत आजोबांचा बलिदान; तरीही SPO पदावरून वारसांवर अन्याय
Next articleमराठ्यांची वाघीण – शालिनीताई पाटील यांचे दुःखद निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.