आशाताई बच्छाव
पोलीस नक्षल चकमकीत आजोबांचा बलिदान; तरीही SPO पदावरून वारसांवर अन्याय
साक्षीता होळी यांची माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची विनंती
मालेवाडा/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ— माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कडे नक्सल पीडित साक्षीता होळी यांनी SPO (स्पेशल पोलिस ऑफिसर) पदावर पुन्हा नियुक्ती करण्याकरिता निवेदन सादर केले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले कि, पोमके मालेवाडा यांनी कोणतेही ठोस अथवा लेखी कारण न देता त्यांना अचानक SPO पदावरून काढून टाकण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विशेष बाब म्हणजे, साक्षीता होळी यांच्या आजोबांचे 1991 साली पोलीस–नक्षल चकमकीत मरण झाले होते. अशा कुटुंबातील सदस्याला शासनाकडून न्याय मिळणे अपेक्षित असताना, संबंधित याचिकाकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे.
साक्षीता होळी यांच्यासोबत आणखी चार SPO कार्यरत असताना, फक्त त्यांनाच सेवेतून कमी करण्यात आले, तर उर्वरित चार SPO यांना कायम ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्या चार SPO च्या कुटुंबातील कोणताही सदस्य पोलीस किंवा नक्षल चकमकीत शहीद झालेला नाही, असेही सांगण्यात येत आहे.
साक्षीता होळी या गरीब कुटुंबातील असून SPO म्हणून कार्यरत असताना मिळणाऱ्या मानधनावर त्या आपले शिक्षण पूर्ण करत होत्या. मात्र अचानक सेवेतून काढण्यात आल्यामुळे त्यांच्या शिक्षणात मोठा खंड पडला असून त्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना फोन लावून सदर युवतीला पुन्हा spo म्हणून नियुक्ती देण्याची विनंती केली.






