Home गडचिरोली महात्मा गांधी शाळेच्या प्रवेशद्वारात अस्वच्छतेचे साम्राज्य – विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ

महात्मा गांधी शाळेच्या प्रवेशद्वारात अस्वच्छतेचे साम्राज्य – विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ

288

आशाताई बच्छाव

1002339449.jpg

महात्मा गांधी शाळेच्या प्रवेशद्वारात अस्वच्छतेचे साम्राज्य – विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ          गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

फुले वॉर्ड क्रमांक ३ येथील महात्मा गांधी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सध्या घनकचऱ्याचे ढीग साचले असून, अनेक नागरिकांकडून त्या ठिकाणी उघड्यावर मूत्रविसर्जन केले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामुळे शाळेतील निरागस विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दररोज शेकडो विद्यार्थी या प्रवेशद्वारातून शाळेत ये-जा करतात. मात्र, दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचा धोका यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शाळेच्या मुख्य दरवाज्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असले तरी ते केवळ शोभेची वस्तू ठरत असून, त्याचा कोणताही प्रत्यक्ष उपयोग होताना दिसत नाही.

स्वच्छ भारत अभियानाचा नारा देणाऱ्या प्रशासनाच्या नाकाखाली ही परिस्थिती निर्माण होणे अत्यंत दुर्दैवी आहे. भविष्यात याठिकाणी साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असून, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर येते.

तरी, या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, शाळेसमोरील परिसराची नियमित स्वच्छता करावी, उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून त्याचा प्रभावी वापर करावा, अशी जोरदार मागणी पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, याकडे दुर्लक्ष झाल्यास ती मोठी चूक ठरेल, एवढे मात्र निश्चित.