आशाताई बच्छाव
देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील महालपाटणे पाठोपाठ आता खालप ग्रामपंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला असून , अकरा सदस्य संख्या असलेल्या खालप ग्रामपंचायतीच्या तब्बल सात सदस्यांनी सरपंच विश्वात घेत नसल्याने गुरुवारी (दि ८ ) रोजी ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झाल्टे यांच्याकडे सामूहिक तसेच वयक्तिक राजीनामे सुपूर्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,देवळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या नावाजलेल्या खालप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असतांना राजकिय घडामोडींना वेग आला असून, एकूण अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच विमल सुमंत सुर्यवंशी ह्या इतर सदस्यांना विश्वासात घेत नसल्याने पत्र काढत त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून एकूण सात सदस्यांनी गुरुवारी दि ८ रोजी ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झाल्टे यांच्याकडे सामूहिक तसेच वैयक्तिक राजीनामे सादर केले .
या अनपेक्षित घडामोडींमुळे ग्रामपंचायतीत सत्तासंघर्षाचे वारे वाहू लागले आहेत. पुढील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजया कैलास देवरे , मनिषा वसंत सुर्यवंशी , वैशाली किशोर सुर्यवंशी , संतोष कृष्णा डामरे , हिरामन रुपचंद पवार , बाजीराव महादु सुर्यवंशी ,कांताबाई पंडीत पिंपळसे या सात विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच गाव विकासाच्या कामकाजात विश्वासात घेत नसल्याने त्यांनी आपला राजीनामा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे . यामुळे गावात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे .हे राजीनामे मंजूर होतात का ? याचे औत्सुक्य लागून राहिले आहे .
@ यासंदर्भात सरपंचांच्या आदेशानुसार मीटिंग काढण्यात येऊन त्यात सदस्यांचा राजीनाम्यावर विचार विनियम होईल . राजीनामे मंजूर झाल्यास ते गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविले जातील . यानंतर पुढील कार्यवाही होईल .
जितेंद्र झाल्टे, ग्रामविकास अधिकारी ,खालप ता देवळा
फोटो ओळ ; ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झाल्टे यांच्याकडे सामूहिक राजीनामा पत्र सादर करताना खालप येथील ग्रामपंचाय सदस्य






