आशाताई बच्छाव
वरवंड येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार, अधिकाऱ्यांनी स्पॉटवर केली पाहणी, नंतर अपहार केल्याच्या वसूल पात्र रकमाही काढल्या, तीन वर्षानंतर 14 वा वित्त आयोगाचे रेकॉर्ड गायब, तक्रारकर्त्यांवर आत्मदहनाची वेळ….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगत मताने भ्रष्टाचार केलाआशी तक्रार वरवंड
येथील अशोक चावरे व प्रकाश जेऊघाले यांनी पंचायत समिती बुलढाणा येथे लेखी स्वरुपात दिलेली होती. तक्रारीची शासनाने दखल घेतली वरवंड येथील ग्रामपंचायतची सदर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली या समितीने झालेल्या कामाची जागेवर (स्पॉटवर) जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी केलेली कामे आढळली नाही त्यामुळे त्या कामाची वसूल पात्र रक्कम ही काढण्यात आल्या सरपंच व ग्रामसेवक यांनी अपहार केल्याचे सिद्धही केले मात्र ज्या अधिकाऱ्यांनी वसूल पात्र रकमा काढल्या होत्या त्यांची कालांतराने बदली झाल्यामुळे या प्रकरणावर थंड बस्त्या पडले. पण तक्रारकर त्यांनी हार न मानता याचा परत
पाठपुरावा केला दोन वर्षापासून वारंवार तक्रारी केल्यानंतर शासनाकडून लेखी स्वरूपात
पत्रव्यवहार केल्या जात आहे. बुलढाणा पंचायत
समितीचे विस्तार अधिकारी यांनी वरवंड येथील
ग्रामपंचायत मध्ये गेले असता त्यांना 14 वा वित्त
आयोगाबाबत अभिलेखा आढळून आला नाही
त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय वरवंड येथे
14 वा वित्त आयोग रेकॉर्ड ग्रामपंचायत मध्ये हजर
करा अशे म्हटले आहे. तक्रार करताना सुद्धा निवेदनाची प्रत देण्यात आलेली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये शासनाने पत्र व्यवहार केला या पत्रव्यवहारांमध्ये 14 वा वित्त आयोगाचे दस्तावेज अभिलेखा उपलब्ध नाही असे त्या पत्र व्यवहारात लिहिलेले आहे त्यामुळे ग्रामपंचायत मधील 14 वा वित्त आयोगाचे रेकॉर्डच गायब होतं याला जबाबदार कोण? शासनाच्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी टाळाटाळ तर करत नसेलना असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थितीत होत आहे. वरवंड येथील अशोक चावरे व प्रकाश जेऊघाले यानी
दिनांक 08 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, वरील विषयाच्या संबंधाने आपले कार्यालयाकडे यापूर्वी रितसर तक्रारी दिलेल्या आहेत. मात्र त्यानुसार संबंधीतांकडून वसूल पात्र रक्कम शासनखाती जमा करावी असा अहवाल सुध्दा आपले कार्यालयास प्राप्त झालेला आहे. याउलट वरील संदर्भीय पत्रात नमूद केलेल्या मजकूराचे अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की, ग्राम पंचायत वरवंड चौदावा वित्त आयोग व इतर तत्सम अभिलेखे तपासणीवेळी ग्राम पंचायतीमध्ये मागणी केली असता, अभिलेखे उपलब्ध करुन दिले नाही.
त्यामुळे ग्राम पंचायत वरवंड यांचे कार्यालयाकडे 14 वा वित्त आयोगाबाबत दस्ताऐवज / अभिलेखे उपलब्ध आहेत कि नाही याबाबत संशय निर्माण होत आहे. कदाचित यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने सदरची अभिलेखे उपलब्ध करुन दिली नसावी असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तरी आपणास विनंती करण्यात येते की, वरवंड येथील 14 वा वित्त आयोगाबाबत अभिलेखाची आपले स्तरावरुन समिती नेमून तपासणी करण्यात यावी व त्यामध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधीतांवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही करावी. 07 दिवसाचे आत कार्यवाही न झाल्यास मा.गट विकास अधिकारी, पं. स. कार्यालय बुलडाणा यांचे कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे.






