Home बुलढाणा संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचा आज होणार राज्यस्तरीय सन्मान

संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचा आज होणार राज्यस्तरीय सन्मान

172

आशाताई बच्छाव

1002716035.jpg

संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचा आज होणार राज्यस्तरीय सन्मान

वसंतराव काणे ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कारासाठी आज कर्जत येथे भव्य सोहळा

प्रतिनिधी | संग्रामपूर
तालुक्याच्या पत्रकारितेचा अभिमान उंचावणारी बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतराव काणे ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार यंदा संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला आहे. अमरावती महसूल विभागातून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची निवड झाल्याची अधिकृत घोषणा मुंबई येथील मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी केली.
राज्य पातळीवरील हा गौरवशाली पुरस्कार सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ अशा स्वरूपात प्रदान करण्यात येणार असून दिनांक २२ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे रॉयल गार्डन येथे भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात आज पुरस्कार वितरण होणार आहे.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची संपूर्ण टीम उत्साहात रवाना झाली आहे. अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अझहर अली, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, हल्लाकृती समिती सदस्य सागर,विभागीय संघटक डॉ. संतोष लांडे, जिल्हा समिती सदस्य आकाश पालीवाल, हल्लाकृती समिती स्वप्निल देशमुख, सागर कापसे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्याम देशमुख, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी, सचिव विवेक राऊत, उपाध्यक्ष अब्दुल भाई, उपाध्यक्ष कासम सुरत्ने, कोषाध्यक्ष वासुदेव दामोधर, तालुका संघटक श्याम इंगळे, मोहन सोनोने, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष गोपाल धर्मळ, उपाध्यक्ष भगवान पाखरे, ज्ञानेश्वर आतकरे, विठ्ठल निंबोळकार, नंदू पाटील खानझोड आदी पदाधिकारी या सोहळ्यास आज २२ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहणार आहेत.
बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रंजीतभाई राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या पथकाला बुलढाणा येथून उत्साहात रवाना करत शुभेच्छा दिल्या.
संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारितेने सामाजिक प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि ग्रामीण भागातील समस्यांना सातत्याने वाचा फोडत केलेल्या कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. या सन्मानामुळे तालुक्याच्या पत्रकारितेच्या कार्याला नवी उर्जा आणि व्यापक दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज सोशल अवॉर्डने राजेंद्र पाटील राऊत यांचा गौरव         
Next articleEpaper Yuva maratha 22 February
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.