Home Breaking News देशभरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा!

देशभरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा!

132

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0077.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे:   तीन वर्षाच्या प्रदीर्घकाळानंतर रक्षाबंधन उत्साहात साजरे! कोरोना काळातील महामारीनंतर रक्षाबंधन पूर्ण भारत देशामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना देखील खासदार भावना गवळी यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. पंतप्रधानांनी लहान मुलांच्या सानिध्यात हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत अमृत महोत्सव रक्षाबंधन सादर केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी देखील महिला पोलिसांबरोबर रक्षाबंधन साजरे केले. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सुप्रिया सुळेंनी देखील अजित दादांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहीण भावांच्या या प्रेमळ नात्यांचा अविष्कार म्हणून रक्षाबंधन खूप उत्साहाने पार पडला.

Previous articleकोयना धरणाने धोक्याची पातळी ओलांडली
Next articleमयेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.