Home रत्नागिरी मयेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान

मयेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान

105

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0037.jpg

मयेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान                           रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे मधील ‘राष्ट्रीय सेवा योजना विभागा’ तर्फे देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवाचे औचित्य साधून परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान उपक्रम राबवला.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्या स्नेहा पालये आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. अवनी नागले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र व वरवडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ३० विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. या कामगिरीबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुनिल मयेकर, सचिव रोहित मयेकर, संचालक श्री. सुरेंद्र माचिवले यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous articleदेशभरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा!
Next articleमालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजच्यावतीने “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत प्रभात फेरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.