Home रत्नागिरी मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजच्यावतीने “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत प्रभात फेरी

मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजच्यावतीने “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत प्रभात फेरी

102

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0032.jpg

मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजच्यावतीने “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत प्रभात फेरी

रत्नागिरी ,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)  तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षा निमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शाळा ते मालगुंड बाजारपेठ अशी प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत माता की जय, स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाचा विजय असो, अशा स्वातंत्र्यपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांबरोबर परिसरातील नागरिकांमध्ये सुद्धा यावेळी तेवढाच उत्साह व जोश होता.

प्रशालेच्या वतीने या मोहिमेअंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यातीलच एक भाग म्हणजे ही प्रभात फेरी. या प्रभातफेरीत प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक सहभागी झाले होते.

Previous articleमयेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान
Next articleगणपतीपुळे येथे स्वच्छता अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.