Home उतर महाराष्ट्र ऑपरेशन सिंदूर-पिक्चर अभी बाकी है। संपूर्ण भारतात समाधानाचा ‘हुंकार’ – शिंदखेडा शहरात...

ऑपरेशन सिंदूर-पिक्चर अभी बाकी है। संपूर्ण भारतात समाधानाचा ‘हुंकार’ – शिंदखेडा शहरात भाजपाकडून आनंदोत्सव

161

आशाताई बच्छाव

1001487051.jpg

ऑपरेशन सिंदूर-पिक्चर अभी बाकी है।
संपूर्ण भारतात समाधानाचा ‘हुंकार’ – शिंदखेडा शहरात भाजपाकडून आनंदोत्सव
(विरदेल प्रतिनिधी :- राकेश बेहेरे पाटील).
सातत्याने जगभरात दहशतवादी हल्ला करून दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून पाकिस्तानने आपली ‘जागतिक प्रतिमा’ निर्माण केली आहे. भारताचे शेजारील राष्ट्र म्हणून पाकिस्तान सीमारेषेवर सातत्याने घुसखोरी करत प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात छुप्या पध्दतीने पाठवितो. असाच प्रकार 22 एप्रिल रोजी करून 4 दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मिर मधील पहलगाम येथे निरपराध भारतीय पर्यटकांना जाब विचारून गोळ्या घालून ठार मारले. आणि भारतीय महिलांच्या कपाळावरील ‘सिंधूर’ पुसला. या घटनेचा ‘बदला’ घेण्यासाठी तब्बल 15 दिवसांनंतर भारतीय लष्कराने पाकवर हल्ले करत ‘आपरेशन सिंदूर’ ची झलक दाखविली. हया पाश्वभूमीवर शिंदखेडा येथील भगवा चौकात शहर भाजपाकडून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात फटाके फोडत व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. हयावेळी भारतीय लष्कराच्या कामगिरी बद्दल तोंडभरून कौतुक करण्यात आले. हया प्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन , माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, उल्हास देशमुख, जिल्हा सरचिटणीस प्रविण माळी, प्रकाश चौधरी, युवराज माळी, दिपक चौधरी, अँड. विनोद पाटील, दादा मराठे ,दगा बापु चौधरी, बन्सीलाल बोरसे, गुलाब सोनवणे, भुपेंद्र देवरे,नाना कुवर, जितेंद्र भामरे,राहुल महिरे ,बबलु मराठे अबु कुरेशी, उमेश गिरासे, देविदास माळी,गणेश खलाणे ,दिनेश सुर्यवंशी, सिकंदर वाघ,गोपाल चौधरी, बुरमल जैन,सतिष पाटील, यासह शिंदखेडा शहरातील माजी सैनिकांनी विशेष हजेरी लावली त्यात ज्ञानेश्वर गिरासे, प्रमोद गुरव, सोमनाथ बडगुजर, प्रकाश जोशी ,बाबुलाल जगदाळे, संजीव नगराळे, भुषण पवार, शांताराम जाधव, पुंडलिक माळी,ईश्वर सोनवणे, प्रविण बडगुजर,योगेश कोळी, जितेंद्र गिरासे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.