आशाताई बच्छाव
जिंतूर तालुक्यातील पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
(परभणी) जिंतूर:-तालुक्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने खरिप हंगामातील कापुस, तुर, मुग व सोयाबीन हि पिके धोक्यात आली असल्याने पाऊस कधी पडतो यासाठी बळिराजाचे डोळे चिंताग्रस्त अवस्थेत अकाशाकडे लागले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी वरुणराजाने शेतकऱ्याच्या समस्येकडे चांगलीच डोळेझाक केल्याचे दिसुन येत आहे.
खरिप पेरणीपासून बळीराजाच्या नशीबी धकधक सुरु झाली मृगनक्षत्रात पेरणी केलेले सोयाबीन दुबार पेरणी करावी लागल्याने आर्थिक संकट ओढावले गेले. कर्जबाजारी अवस्थेत कसीबसी दुबार पेरणी केली परंतु त्यानंतरही पाहिजे तसा पाऊस पडला नाही..
रिमझिम अवस्थेतच खरिप पिकांनी जोम धरला. दमदार पावसाची अपेक्षा कायमच राहिली गेली परंतु सद्यस्थितीत हि पावसाची प्रतिक्षाच करावी लागत आहे खरिप हंगामातील कापुस पिके बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहेत तर सोयाबीन पिकाला शेंगा लागण्यास सुरुवात झाली. परंतु पावसाचा थांगपत्ताच लागत नसल्याने खरिप पिके धोक्यात आली असल्याने पाऊस कधी पडतो यासाठी बळिराजाचे डोळे अकाशाकडे लागले आहेत.