Home परभणी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज 26 एप्रिल रोजी मतदान

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज 26 एप्रिल रोजी मतदान

19
0

Yuva maratha news

1000315239.jpg

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज 26 एप्रिल रोजी मतदान

परतूर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

— जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे; प्रत्येकाने आपला मताधिकार बजावावा

 

जालना, दि. 25 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : परभणी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या शुक्रवार, दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात जालना जिल्ह्यातील परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे; प्रत्येकाने आपला मताधिकार बजावावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

 

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. विशेषत:  मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्रालगत स्वतंत्र कक्षामध्ये बैठक, वीज, पंखे, पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

मतदारसंघातील सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा. विशेषतः मतदारसंघाच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अवश्य यावे. सर्वच मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात जरूर सहभागी व्हावे. नव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून, लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

***

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here