Home बीड आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्याचा झालाय खेळ नागरिकांना पंखे, कुलरची हवा घेण्याचा जमेना मेळ

आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्याचा झालाय खेळ नागरिकांना पंखे, कुलरची हवा घेण्याचा जमेना मेळ

25
0

Yuva maratha news

1000315260.jpg

आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्याचा झालाय खेळ नागरिकांना पंखे, कुलरची हवा घेण्याचा जमेना मेळ

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड : शहरात महावितरण कंपनीकडून केला जाणारा विद्युत पुरवठा थोडा जरी वारा सुटला किंवा पावसाचे चार थेंब पडले तरी लगेच बंद होतो. यामुळे सध्याच्या तप्त वातावरणात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तर दुसरीकडे मात्र महावितरण कंपनीला याचे थोडेही गांभीर्य असल्याचे दिसत नाही. महावितरण कंपनी विद्युत पुरवठ्याचा खेळ मांडला असल्याचे दिसत असल्याने तप्त उन्हात दिलासा मिळावा याकरिता नागरिकांना मात्र पंखे आणि कुलर लावण्याचा वेळ जमेना. महावितरण कंपनीची यंत्रणा गेल्या पाच दिवसापासून यावर काम करत असल्याचा दावा करत असली तरी अजूनही बीड शहरात कुठे चार पाच तास तर कुठे अर्धा तास तर कुठे दिवसभर लाईट नसते. महावितरणच्या या गलथान कामामुळे शहरात होणारा पाणीपुरवठाही अनेक दिवस उशिराने होत आहे. यामुळे नागरिकांना एकीकडे वीज नसल्याने पंखे व कुलर लावता येत नाही. तर दुसरीकडे भर उन्हाळ्यात पाण्याची निनांत आवश्यकता असताना पाणीपुरवठा लांबतच चालला आहे. कुठे २० तर कुठे २५ दिवसांनी नळाला पाणी येत आहे, यामुळे बीडकरांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे. बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांनी विद्युत बिघाडाची दखल घेऊन नळाला दोन दिवस उशिराने पाणी येणार असल्याचे पत्रक काढले होते. त्याला आता चार दिवस होऊनही महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहराच्या अनेक भागात अजूनही नळाला पाणी आलेले नाही. दरम्यान महावितरण कंपनीकडून विना खंड विद्युत पूरवठा होत नसल्याने शहरात थोडे जरी वारे सुटले किंवा पावसाचे चार थेंब जरी पडले की, बीड शहरवासीयांच्या मनात धस्स होतंय. कारण पटकन लाईट बंद होते यामुळे महावितरण कंपनीकडून सुरळीत विद्युत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे.

Previous articleपरभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज 26 एप्रिल रोजी मतदान
Next articleशेती माल विषयी नवीन निर्यात धोरण; ‘या’ 20 पिकांची निर्यात वाढणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here