• Home
  • *भारताने तयार केली पहीली फेलुदा* *कोरोना टेस्ट* *कमी वेळात मिळणार अहवाल*

*भारताने तयार केली पहीली फेलुदा* *कोरोना टेस्ट* *कमी वेळात मिळणार अहवाल*

*भारताने तयार केली पहीली फेलुदा* *कोरोना टेस्ट*
*कमी वेळात मिळणार अहवाल*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

राज्यात सध्या कोरोनाव्हायरसचं निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. या टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी वेळही जास्त लागतो, शिवाय खर्चही जास्त आहे. मात्र आता आरटी-पीसीआरइतकीच परिणामकारक मात्र त्यापेक्षा कमी खर्चिक आणि कमी वेळेत रिपोर्ट देणारी टेस्ट आता भारतात विकसित करण्यात आली आहे.
टाटा ग्रुप आणि सीएसआयआर इन्स्टिट्युट ऑफ जेनॉमिक्स अँड इन्टिग्रेटिव्ह बायोलॉजीने (सि एसआयआर-आय जीआय बी)
एकत्रितरित्या कोरोना टेस्ट तयार केली आहे.
क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिनड्रॉमिक रिपिट्स कोरोना टेस्ट म्हणजे क्रिस्पर कोरोना टेस्ट (सिआर आयएसपीआर कोरोना टेस्ट) ज्याला फेलुदा , असं नाव देण्यात आलं आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डिसीजीआय) ने फेलुदा टेस्टला परवानगी दिली आहे.
(एसएआरएस-सिओव्ही2) व्हायरसच्या जेनॉमिक सिक्वेंसचं निदान करण्यासाठी स्वदेशी सिआरआयएसपीआर तंत्रज्ञानाचा वापर करतं. यामार्फत भविष्यात इतर महासाथीची टेस्टदेखील करता येऊ शकते.
सीआरआईएसपीआर ही सीएएस-9 प्रोटीनचा वापर करणारी जगातील पहिली अशी टेस्ट आहे, जी यशस्वीरिक्या कोरोनाव्हायरसचं निदान करू शकते.

anews Banner

Leave A Comment