Home Breaking News एकाच कुटुंबामधील पाच जण बुडाले, लोणावळ्या मध्ये खूप धक्कादायक प्रकार घडला.

एकाच कुटुंबामधील पाच जण बुडाले, लोणावळ्या मध्ये खूप धक्कादायक प्रकार घडला.

22
0

Yuva maratha news

1000511932.jpg

पुणे /हवेली प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : एकाच कुटुंबामधील पाच जण बुडाले, लोणावळ्या मध्ये खूप धक्कादायक प्रकार घडला. सध्या पावसाचे वातावरण सुरू असल्यामुळे अनेक पर्यटक फिरण्यासाठी बाहेर जात आहेत. त्यामध्ये लोणावळ्यात भुशी डॅम च्या परिसरामध्ये खूप धक्कादायक प्रकार घडला. वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या एका धबधब्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यामध्ये आतापर्यंत शोध मोहिमेमध्ये चार जणांचे मृतदेह सापडलेले आहेत. अजून एकाचा शोध सुरू आहे. हे सर्व पाच जण एकाच कुटुंबातील आहेत. हे अन्सारी कुटुंब फिरायला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग खूप होता त्यामुळे ते त्यात वाहून गेले. त्या पाच जणांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे. अशा प्रकारचे धक्कादायक प्रकार होऊ नये यासाठी सर्व पर्यटकांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे अशा तऱ्हेचा सोर जनतेमध्ये उमटला आहे. पाण्याचा अंदाज पाहूनच काही गोष्टी कराव्यात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये यासाठी स्वतः तत्वर राहणे गरजेचे आहे.

Previous articleनाशिक शिक्षक मतदारसंघात निकालापूर्वीच झळकले उमेदवारांच्या विजयाचे बॅनर
Next articleनामपूरला दिवसा घरफोडी; दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here