Home बीड परळीच्या शिरतेचात मानाचा तुरा धनराज आदोडे यांची सहाय्यक संशोधन अधिकारी पदी निवड

परळीच्या शिरतेचात मानाचा तुरा धनराज आदोडे यांची सहाय्यक संशोधन अधिकारी पदी निवड

42
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_081530.jpg

परळीच्या शिरतेचात मानाचा तुरा धनराज आदोडे यांची सहाय्यक संशोधन अधिकारी पदी निवड

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: ०२  परळी शहरातील शारदा नगर भागातील रहिवासी असलेल्या धनराज मारुती आदोडे यांची अर्थ व सांख्यिकी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब (अराजपत्रित) म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे अर्थ व सांख्यिकी विभाग देण्यात आला आहे. धनराज यांच्या या निवडीने परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सविस्तर माहिती अशी की, परळी शहरातील शारदानगर विभागातील रहिवासी मारुती आदोडे यांचे चिरंजीव धनराज आठवडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री वैद्यनाथ विद्यालय परळी येथे पूर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर आदोडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय मुंबई येथे सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब (अराजपत्रित) म्हणून नियुक्ती करण्यात आली. यांच्याकडे अर्थ व सांख्यिकी विभागाचा कारभार देण्यात आला आहे. सामान्य परिस्थितीतून अपार मेहनत, जिद्द व चिकाटीने धनराज आदोडे यांनी शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची यशाला गवसणी घातली. त्यांचे हे यश परळीतील सामान्य कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. आदोडे यांच्या या निवडीचे परळीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर व मित्र परिवाराच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या भंडारा जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा आशिष चेडगे यांची फेरनिवड
Next articleधांद्रीच्या राममंदिरात धाडसी चोरी,नागरिकांत खळबळ (दावल पगारे विशेष प्रतिनिधी)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here