Home भंडारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या भंडारा जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा आशिष चेडगे...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या भंडारा जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा आशिष चेडगे यांची फेरनिवड

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_081134.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या भंडारा जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा आशिष चेडगे यांची फेरनिवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली तालुका, शहर कार्यकारणीचेही नवीनीकरण

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)– प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या शासनमान्य पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सत्य पोलिस टाईम चे मुख्य संपादक डि. टी. आंबेगावे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या सूचनेनुसार भंडारा जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा आशिष चेडगे यांची फेरनिवड केली आहे. निवड करतांना राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सांगितले की, साकोलीत प्रथमच पत्रकारांच्या सोयीसाठी ६ जानेवारी पत्रकार दिनीच ‘पत्रकार भवन’ निर्माण कार्याचा शुभारंभ करून दाखविला आहे यात जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे व यांच्या साकोली चमूने जी मेहनत घेतली ती प्रशंसनीय असून ही अत्यंत आवश्यक बाब होती. आशिष चेडगे यांच्या या पुन्हा फेरनिवडीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि पदाधिकारी पत्रकार सदस्यगणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघटनेचे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी कार्यरत असून पत्रकारांचे विविध प्रश्न आणि मुलभूत सुविधा या रास्त मागण्यांसाठी संस्थापक अध्यक्ष डि. टी. आंबेगावे यांचा शासनाकडे पाठपुराव्यांचा सतत लढा सुरू आहे. पत्रकारांना त्यांच्या न्याय हक्काच्या सुखसुविधा मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार अशीच प्रतिक्रिया डि. टी. आंबेगावे यांचे प्रत्येक राज्यात विविध पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ठाम भूमिका असते. राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सांगितले की, भंडारा जिल्ह्यात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातील प्रत्येक आणि विविध विषयांकीत मुद्द्यांवर आशिष चेडगे यांचा साकोली मिडीया हा ठाम असतो आणि बेधडक निर्भिडतेने सत्य स्थिती जनतेसमोर आणत असतो. यात साकोली मिडीयाची प्रेस फोटो व विडीयो प्रसारण कौतुकास्पद आहे.
भंडारा जिल्हाध्यक्षपदी पुन्हा आशिष चेडगे यांची फेरनिवड झाल्याबद्दल राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व पूर्व विदर्भ समन्वयक सुरेशकुमार डुंभरे,भंडारा जिल्हा सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार ( तुमसर ), जिल्हा प्रभारी डॉ. अक्षय कहालकर, युवती अध्यक्षा रोहिणी रणदीवे, लाखांदूर ता ‌ अध्यक्ष प्रा. प्रेमानंद हटवार, साकोली ता. अध्यक्ष निलय झोडे, शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले, सचिव किशोर बावणे, रवि भोंगाणे, सदस्य ताराचंद कापगते, ता. सचिव मनिषा काशिवार, शेखर ईसापुरे, दुर्गेश राऊत, यशवंत कापगते, जयकृष्ण डूंभरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleसुख दुःखाचे साथीदार (आयुष्यातील घडामोडीचा रोखठोक आढावा)!       
Next articleपरळीच्या शिरतेचात मानाचा तुरा धनराज आदोडे यांची सहाय्यक संशोधन अधिकारी पदी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here