Home Breaking News 🛑 उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया…..! राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाचे अंमलबजावणी नाही 🛑

🛑 उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया…..! राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाचे अंमलबजावणी नाही 🛑

115
0

🛑 उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया…..! राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाचे अंमलबजावणी नाही 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ नव्या कृषी विधेयकावरुन आज शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.

पंजाब बंदमध्ये 31 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. संसदेत समंत करण्यात आलेल्या तीन शेती विधेयकामुळे कृषी बाजाराची व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान राज्य सरकारकडून देखील या विधेयकांना विरोध असल्याचं समोर आलं आहे. ही विधेयक लागू करण्यासाठी ऐवढी घाई कशासाठी, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी आणि कामगार विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, केंद्राचे कृषी विधेयक शेतक-यांचे फायद्याचे नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे अस्तित्वात यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात या विधेयकाची अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध आहे. परंतु अंमलबजावणी केली नाही तर काय परिणाम होतील..

न्यायालयात गेले तर काय होईल याबाबत अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले…..⭕

Previous article*मारुती मंदिर सार्वजनिक ट्रस्ट व ग्रा.पं. धामणेर यांच्या संयुक्त* *विद्यमानाने कोविंड सेंटरचा* *लोकार्पण*
Next article🛑 सरकार मराठा समाजा सोबत ….! मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणारा :- उद्धव ठाकरे 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here