आशाताई बच्छाव
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे -डॉ. संजय मानकर
संजीव भांबोरे
भंडारा , (जिल्हा प्रतिनिधी )शहरातील भगतसिंग वाढ नवीन टाकळी येथील म.अनीस कार्यालय येथे शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने आज दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डा. संजय मानकर होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, सौ. कविता लोणारे ,संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हा सल्लागार चंद्रशेखर खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय मानकर यांनी सांगितले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कार्य केले. समाजात असलेली अंधश्रद्धा दूर व्हावा यासाठी कार्य केले तसेच व्यसनमुक्त समाज व्हावा म्हणून अत्यंत प्रभावीपणे भजन कीर्तनाच्या माध्यमातून गावागावातून लोकांना जागृत केले परंतु आजही समाज हा अंधश्रद्धेला खतपाणी घालत असून व्यसनाकडे वळत आहे म्हणून आज वाढत्या व्यसनाला व वाढत्या धार्मिक अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घरोघरी व समाजापर्यंत पोहोचावे असे त्यांनी मत व्यक्त केले. तसेच संविधान बचाव संघर्ष समितीचे चंद्रशेखर खोब्रागडे यांनी सांगितले की जोपर्यंत आपला भारतीय संविधान आहे तोपर्यंत आपण एकसंघ आहोत. आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि आपणं सर्वांना जर आपले न्याय, हक्क व अधिकार टिकाऊन ठेवायचे असेल तर प्रत्येक भारत वासियानी सविधानाचे रक्षण करणे खुप महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी “मनी नाही भाव देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे “देव दगडात नाही रे असा ठणठणीत भजनाद्वारे लोकांना मार्गदर्शन केले तरी आजही २१व्या शतकात देव धर्माच्या नावावर माणसाला माणसापासून दूर नेण्याचे कार्य सुरू आहे.असे मत. लोणारे यांनी मांडले. नितेश बोरकर यांनी संचालन केले तर कार्यक्रमाचे आभार सौ. कविता लोणारे यांनी मांनले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अवनी लोणारे, मानव लोणारे, रूपाली लोणारे , सायल लोणारे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अतुल लोणारे जोंधरू राऊत, मीरा राऊत सुविधा लोणारे तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.






