Home भंडारा राज्यातील कामगारांची नोंद होऊ शकते !मग शहरी ,ग्रामीण पत्रकारांची का नाही?– समाजसेवक...

राज्यातील कामगारांची नोंद होऊ शकते !मग शहरी ,ग्रामीण पत्रकारांची का नाही?– समाजसेवक पत्रकार श्रीकृष्ण देशभ्रतार

143

राज्यातील कामगारांची नोंद होऊ शकते !मग शहरी ,ग्रामीण पत्रकारांची का नाही?– समाजसेवक पत्रकार श्रीकृष्ण देशभ्रतार

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ अधिस्वीकृती प्रकरण मागील पाच वर्षापासून शासनाकडे धुळखात?

पत्रकार संरक्षण मंडळ का नाही ?

संजीव भांबोरे
भंडारा -तुमसर येथील साप्ताहिक जनता की आवाज कार्यालय येथे 194 व्या मराठी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांच्या हस्ते माल्यार्पण करून मराठी पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जनता की आवाज चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार म्हणाले की ,या राज्यात कामगारांची नोंद होऊ शकते !मग ऊन, वारा, पाऊस, मध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या ग्रामीण पत्रकारांची नोंद का होत नाही!लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचे प्रश्न तात्काळ सोडविल्या जात नाही ?अधीस्वीकृती करिता अनेक पत्रकारांचे प्रश्न मागील ५ वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहेत .परंतु त्यांचे प्रश्न सुद्धा निकाली निघालेले नाहीत .त्याचप्रमाणे शासन स्तरावर पत्रकार संरक्षण मंडळ सुद्धा स्थापन झालेले नाही .फक्त पत्रकारांनी लिखाणच करत राहावे आणि घरी उपाशी राहावे ही कुठली लोकशाही? पत्रकारांचे प्रश्न तात्काळ सोडून त्यांना अशासकीय समित्यांचे प्रतिनिधी, अधिस्वीकृती दर्जा, विमा संरक्षण, संरक्षण कायदा, घरकुल योजना, पत्रकारांकरता महामंडळ अशा अनेक योजना लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना लागू करण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा आपल्या निवेदनातून जनता की आवाज साप्ताहिकाचे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना एका लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.

Previous articleगडचिरोलीकरांनो सावधान!एक क्लिक आणि व्हॉट्सअ‍ॅप हायजॅक; RTO चालान लिंकचा गडचिरोलीत धुमाकूळ!
Next articleराज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा लवकरच मालेगाव नगरीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.