आशाताई बच्छाव
एस. टी. भंडारा कार्यालयामार्फत “”निसर्गाच्या सानिध्यात”” सहलीचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा:- महाराष्ट्र राज्यांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सुरू करण्यांत आलेल्या ‘पॅकेज टुर्स’ योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, भंडारा विभागाच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी , पर्यवेक्षक तथा कर्मचारी यांनी त्यांचे नातेवाईक व आप्तेष्ट यांच्यासोबत नवेगांव/बांध, ईटियाडोह व तिबेटी कॅम्प येथे “”निसर्गाच्या सानिध्यात”” पर्यटन-सहलीचे आयोजन दि. ०७/१२/२०२५ रोजी करण्यांत आले.
या सहलीमध्ये स्वतः विभाग नियंत्रक श्रीमती तनुजा अहिरकर , कामगार अधिकारी पराग शंभरकर , सांख्यिकी अधिकारी राकेश तलमले , कनिष्ठ अभियंता (स्था)श्रीमती समिक्षा जावेकर , पंकज वानखेडे हे सर्व आपआपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. सहलीमध्ये विभागीय कार्यालयातील अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच त्यांचे नातेवाईक व आप्तेष्ठ असे एकुण ५५ लोक उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत आपल्या बच्चा कंपनीसहीत निसर्गाच्या सानिध्यातील या पर्यटन सहलीचा मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे आपण कर्तव्य करीत असलेल्या महामंडळाच्या आपल्याच लालपरी मध्ये पहिल्यांदाच स्वतः तिकीट काढुन प्रवासाचा आनंद घेण्याचा योग या निमित्ताने सर्वांना आला. कोणत्याही प्रकारे मोठेपणाचा आव न आणता अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्वतः बसच्या वाहकाकडून प्रवास दराचे तिकीट काढले व निसर्गाच्या सानिध्यात पर्यटन सहलीचा आस्वाद घेतला. सहलीचे व्यवस्थापन चंद्रप्रकाश तरारे यांनी यशस्वीरित्या सर्व अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनात केले.






