Home नाशिक राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा लवकरच मालेगाव नगरीत

राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा लवकरच मालेगाव नगरीत

251

आशाताई बच्छाव

1002481099.jpg

राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा लवकरच मालेगाव नगरीत

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे

सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रस्थानी असलेल्या व महाराष्ट्रभर युवा मराठा महासंघाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवत असलेल्या आश्रयआशा फाउंडेशन (वऱ्हाणे) मालेगाव महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्ती संस्था मान्यवरांनी आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करून आपणही या सुंदर अशा क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आव्हान युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा आश्रयआशा फाउंडेशनचे सर्वेसर्वा राजेंद्र राऊत पाटील यांनी केले आहे.
आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे महाराष्ट्र आयोजीत “राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ “न भुतो न भविष्यती” असा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ पार पडणार असुन या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा,सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि आपल्या कार्याचा गुणगौरव विशेषांक देऊन सन्मानित केले जाणार आहे.विविध क्षेत्रातील १५१ गुणवंतांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.पुरस्काराच्या नावनोंदणीसाठी आपल्या संपूर्ण कार्याचा अहवाल (बायोडाटा)
लवकरात लवकर
पाठवावा.
पुरस्कार कार्यक्रमात आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या संपूर्ण कार्याची माहिती देण्यात येऊन संस्थेचे आगामी उपक्रमाची माहिती व नियोजन संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असुन आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेसाठी सर्वसाधारण सभासदांची नोंदणीप्रथम नोंदणी करणाऱ्या 1000 वाचकांना संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होता येईल. तेव्हा, जास्तीत जास्त नावनोंदणी आजच करून! सामाजिक चळवळींचा व समाजसेवेचा एक महत्त्वाचा घटक व्हावे असे आवाहन युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा आश्रयआशा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सर्वेसर्वा राजेंद्र राऊत पाटील यांच्या
संपर्क : 9850447685 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सोहळा समिती प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) निफाड यांनी केले आहे.

Previous articleराज्यातील कामगारांची नोंद होऊ शकते !मग शहरी ,ग्रामीण पत्रकारांची का नाही?– समाजसेवक पत्रकार श्रीकृष्ण देशभ्रतार
Next articleYuva Maratha 11 Jan 2026
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.