
आशाताई बच्छाव
श्रीमती जे.आर गुंजाळ विद्यालयातील ग्रंथपाल दिलीप घोगरे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड
श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयात ग्रंथपाल श्री दिलीप घोगरे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रसंगी म.वि.प्र. समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीनभाऊ ठाकरे, चांदवड तालुका संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड निफाड तालुक्याचे म.वि.प्र. संचालक शिवाजी आप्पा गडाख म.वि.प्र. सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर,म.वि.प्र. सेवक सोसायटीचे माजी मानद चिटणीस व विद्यमान संचालक मंगेश ठाकरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे, स्कूल कमिटीचे सदस्य,म.वि.प्र. शाखांचे आजी -माजी मुख्याध्यापक, एल.आय.सी मनमाड शाखेचे डीम मनोज वाघ साहेब, सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.वि.प्र. संस्थेचे सेवक संचालक श्री जगन्नाथ निंबाळकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे यांनी केले. ग्रंथपाल दिलीप घोगरे या़चे वडील श्री. दगू घोगरे यांचा सत्कार म.वि.प्र. संस्थेचे संचालक श्री. जगन्नाथ निंबाळकर यांनी केला. कार्यक्रम प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार घोगरे कुटुंबियामार्फत करण्यात आला. म.वि.प्र संस्थेचे सरचिटणी ऍड. नितीनभाऊ ठाकरे यांच्या शुभहस्ते ग्रंथपाल श्री. दिलीप घोगरे यांचा सपत्नीक आदरपूर्वक सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या उपशिक्षिका सविता दिवटे यांनी दिलीप घोगरे यांच्या सेवापुर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या मनोगतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. विद्यालयाचे उच्चमाध्यमिक विभागाचे प्राध्यापक श्री केदारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले श्री दिलीप घोगरे यांनी वाचनालयाचा सेटअप सतत चांगला ठेवला आहे. दिलीप घोगरे यांची कन्या समीक्षा घोगरे- गडाख यांनी आपल्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या.सेवापूर्ती सत्कार सोहळ्याला उत्तर देताना दिलीप घोगरे यांनी आपल्या सेवा काळातील लेखाजोखा सांगितला. सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सेवापुर्तीच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म.वि.प्र. सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर यांनी सांगितले की सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन दिलीप घोगरे यांनी शिक्षण घेतल्याने कुटु़ंबाची प्रगती कयता आली.विद्यालयातील सेवानिवृत्त पर्यवेक्षक प्रकाश आहेर , दिलीप घोगरे , शिक्षिका उषा सादडे,लता राजगुरू यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून तयार झालेल्या स्टेजच्या शेडचे उद्घाटन नितीन भाऊ ठाकरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच दिलीप घोगरे यांनी संस्थेच्या कर्मवीरांचे फोटोही शाखेला भेट दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा .प्रिया नांदे व विद्यालयाचे शिक्षक रमण गायकवाड यांनी केले.