आशाताई बच्छाव
भैय्यासाहेब साळवे, संतोष आव्हाड बसपातून पदमुक्त
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः बहुजन समाज पार्टीचे जालना विधानसभा अध्यक्ष भैय्यासाहेब साळवे व मातंग भाईचारा शहराध्यक्ष संतोष आव्हाड यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात येत असल्याचे बहुजन समाज पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष रमेश डी. उबाळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, बहुजन समाज पार्टीचे जालना विधानसभा अध्यक्ष भैय्यासाहेब साळवे व मातंग भाईचारा शहराध्यक्ष संतोष आव्हाड यांना वारंवार सांगुनही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आदेश न पाळणे, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सोशल मिडियावर बदनामी करणे, बेशिस्त वागणे या व अन्य कारणांमुळे साळवे आणि आव्हाड या दोघांनाही बहुजन समाज पार्टीतून पदमुक्त करण्यात येत आहे. त्यांच्याशी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपर्कात राहू नये असेही जिल्हाध्यक्ष उबाळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
——