आशाताई बच्छाव
विकासाच्या नावाखाली थापा मारणाऱ्यांना सामान्य जनता घरचा रस्ता दाखवणार ————————————–
सोमठाणा येथील प्रचार सभेत डॉ.कल्याण काळे यांनी व्यक्त केला विश्वास
————————————–जालना(दिलीप बोंडे ब्युरो चीफ) विकासाच्या नावाखाली केंद्रातील भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केवळ थापा मारण्याचे काम केले आहे.महागाई,बेरोजगारी वाढली असून मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनता या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचा विश्वास जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास(इंडिया)आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी आज सोमवारी येथे बोलतांना व्यक्त केला.
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी बदनापूर तालुक्यातील रोषणगाव,बाजार गेवराई बाजार,शेलगाव जिल्हा परिषद गट व बदनापूर शहराची प्रचार सभा सोमठाना येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख,मा.आ.संतोष सांबरे, राजेंद्र राख, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी,जयप्रकाश चव्हाण, बाबूराव पवार,भानुदासराव घुगे, बाबासाहेब डांगे,दीपक डोंगरे,भास्कर मगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना डॉ.कल्याण काळे म्हणाले की,केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्याचे आश्वासन दहा वर्ष सत्ता असतांना पाळले नाही.अत्यंत कमी भाव मिळत असल्याने मागील दोन वर्षापासून आपला कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांनी घरात ठेवले आहे.भां