Home भंडारा डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा कोसरा हे परीक्षा केंद्र विद्यापीठाने रद्द केलेला...

डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा कोसरा हे परीक्षा केंद्र विद्यापीठाने रद्द केलेला पुन्हा साठगाठ करून परीक्षा उन्हाळी २०२४ करिता बहाल,

20
0

आशाताई बच्छाव

1000332651.jpg

डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा कोसरा हे परीक्षा केंद्र विद्यापीठाने रद्द केलेला पुन्हा साठगाठ करून परीक्षा उन्हाळी २०२४ करिता बहाल,

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात कोंढा कोसरा या गावात स्व. श्री. लक्ष्मणजी मोटघरे चारीटेबल ट्रस्ट नागपूर व स्व.श्री. ज्ञानेश्वरजी मेंघरे बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर द्वारा रा.तू.म. नागपूर विद्यापीठ नागपूर तसेच MSBTE मुंबई व पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर द्वारा सल्ग्नित अभ्यासक्रम चालविल्या जात आहेत. या संस्थेद्वारा फक्त B.A. चे अभ्यासक्रम हे अनुदानित असून बाकीचे सगळे अभ्यासक्रम कायम विनाअनुदानित तत्वावर चालविले जात आहेत. B.A. चे अभ्यासक्रम सोडून बाकीच्या कोणत्याच अभ्यासक्रमाला मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत. या दोन्ही संस्थेद्वारा सुरु असलेल्या अभ्यासक्रमाकरिता दरवर्षी १८०० ते १९०० विद्यार्थी प्रवेशित असायचे परंतु मागच्या हिवाळी २०२३ ला संचालक (सामान्य परीक्षा) डॉ. प्रफुल साबळे यांनी प्रत्यक्ष या परीक्षा केंद्राला भेट दिली तेव्हा या केंद्रावर सर्रास मासकॉपी चालत असल्याचे या सेंटरवर आढळल्याने तात्काळ हे सेंटर रद्द करून अशोक मोहरकर महाविद्यालय अड्याळ व शिवाजी सायन्स कॉलेज पवनी येथे या सेंटरचे विद्यार्थी परीक्षा देण्यास पाठविण्यात आले.

PSS कॉलेज पवनी या परीक्षा केंद्राला रद्द करून १५ वर्ष झाले, स्व. निर्धनराव वाघाये कॉलेज लाखनी व पंकज तिजारे महाविद्यालय वेलतूर या दोन्ही महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र जवळपास ५-६ वर्ष होऊन सुद्धा अजूनही विद्यापीठाने हे परीक्षाकेंद्र या महाविद्यालयांना दुसऱ्यांदा दिलेले नाही. परंतु हिवाळी २०२३ ला रद्द केलेले डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालयाचे परीक्षाकेंद्र संस्था अध्यक्ष तथा प्राचार्य यांचे सोबत विद्यापीठ प्रशासनांनी खूप मोठी साठगाठ करून पुन्हा उन्हाळी २०२४ चे परीक्षाकेंद्र देण्यात आलेले आहे. डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालयात होम सेंटर असल्याने येथे विद्यापीठाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाला विदर्भातील खूप लांबून विद्यार्थी Zero Attendence वर खूप मोठी शुल्क देऊन प्रवेश घेतात व फक्त परीक्षेकरिता येऊन उत्तीर्ण होण्याकरिता प्रवेश घेतात व वर्षभर वर्ग क्लास न करता डिग्री घेत असतात. या परीक्षाकेंद्रामुळे भंडारा जिल्ह्यातील व गोंदिया जिल्ह्यातील सगळे परीक्षाकेंद्र अनुकरण करायला लागले परंतु मागच्या हिवाळी २०२३ च्या परीक्षेच्या वेळेस संचालक (सामान्य परीक्षा) डॉ. प्रफुल साबळे यांचे नेतृत्वात प्रत्येक परीक्षा केंद्रावर भेट दिली आणि अशोक मोहरकर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सर्रास मासकॉपी चालत असल्याने तेथील बाह्यपरीक्षक श्री. नेताजी हटवार यांना तात्काळ विद्यापीठाकडून निलंबित करण्यात आले. व डॉ. अरुण मोटपरे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले. तसेच याच महाविद्यालयाचे कॉलेज लेवल ची परीक्षा तसेच प्रातेक्षिक परीक्षा सुद्धा रद्द करून दुसऱ्या कॉलेज ला देण्यात आले. डॉ. अरुण मोटघरे कॉलेजमध्ये अनुदानित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कायम विनाअनुदानित अभ्यासक्रमाला येथे मान्यता प्राप्त शिक्षक नाही त्यामुळे या महाविद्यालयाच्या प्रात्येक्षीत परीक्षा कोण घेतात हा एक मोठा गंभीर प्रश्न परंतु विद्यापीठाचे आशीर्वादाने उच्च शिक्षणाच्या येथे बाजारीकरण केलेला आहे हे महाविद्यालय शिक्षण देणारे नसून काफीच्या साह्याने शिक्षण देणारा कारखाना असून विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शिक्षण शुल्क तसेच क्लियरन्सी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करून तसेच शासनाकडून मिळणारे शिक्षण शुल्क इतर शुल्क व परीक्षा शुल्क लाटण्याच्या उद्देशाने एक प्रकारचा दुकान म्हणून चालवण्यात येत आहे हिवाळी 2023 च्या परीक्षा केंद्रावर डॉक्टर प्रफुल साबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खूप मोठ्या प्रमाणात कापीच्या प्रकरणाला आळा बसला होता व विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती पण व भंडारा जिल्ह्यातील या परीक्षा केंद्रामुळे जो उच्च शिक्षणाच्या दर्जा खालावला होता तो दर्जा डॉ प्रफुल साबळे यांच्या कार्याने दर्जा वाढेल असे भंडारा जिल्ह्यात व गोंदिया जिल्ह्यातील जनतेला खूप मोठ्या प्रमाणात जनतेकडून स्तुती करण्यात येत होती .परंतु विद्यापीठ प्रशासनाने खूप मोठी साठगाठ करून पुन्हा परीक्षा केंद्र बहाल केली आहे यावरून असे स्पष्ट लक्षात येते की आर्थिक साठगाठ करण्याकरता परीक्षा केंद्र रद्द केले होते. की काय, अशी शंका निर्माण झालेली आहे. करिता डॉ अरुण मोटघरे महाविद्यालय हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात यावे व भंडारा जिल्ह्यातील या परीक्षा केंद्रामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा खालावला आहे असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाऊराव गंगाराम पंचवटे यांनी सांगितले आहे.

Previous articleराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे -डॉ. संजय मानकर
Next articleसंस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here