• Home
  • 🛑 मुंबईत लॉकडाऊन होण्याची पुन्हा शक्यता 🛑

🛑 मुंबईत लॉकडाऊन होण्याची पुन्हा शक्यता 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201122-WA0007.jpg

🛑 मुंबईत लॉकडाऊन होण्याची पुन्हा शक्यता 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

कारण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गरज पडल्यास दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असल्याचे म्हटले आहे. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा अशी मागणी केली आहे. पालकमंत्री आणि महापौरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर जाऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय सांगितले.

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे..

त्याचबरोबर अहमदाबादमधील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही वाढतीच आहे. या शहरांची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमानसेवा रद्द करण्याचा पर्याय असल्याचे म्हटले आहे.

अस्लम शेख म्हणाले की, दिल्ली आणि गुजरातमधील ज्याप्रमाणे रुग्ण वाढत आहेत ते पाहता तेथील व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. पण मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करायची किंवा त्या कशा चालवायच्या त्यासाठी नियमावली काय असेल यावर विचार सुरु आहे. उदाहरणार्थ दुबईला गेल्यास तिथे पोहोचल्यावर आधी आरटीपीआर केली जाते, मग हॉटेलमध्ये ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी चाचणी निगेटिव्ह आली तर शहरात फिरण्यासाठी परवागनी दिली जाते अन्यथा क्वॉरन्टाईन केले जाते. आपण तशी एसओपी आणू शकतो. ट्रेनसाठी काय करु शकतो त्यावर विचार करत आहोत. आरटीपीसीआर टेस्ट ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांनी आधीच करुन मुंबईत यावे. त्यांना प्रवेश द्यायचा की क्वारंटाईन करायचा याचा विचार सुरु आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी टास्क फोर्स काम करत आहे. गरज पडली एसओपी आणू किंवा रेल्वे, विमानसेवा बंद करु.

तर दुसरीकडे 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्यांनी ही मागणी कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने केली आहे. कोविड रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे….⭕

anews Banner

महाराष्ट्र शासनात तब्बल २ लाख १९३ जागा रिक्त : तरी बेरोजगारी वाढते का? मुंबई : (अंकुश पवार,ठाणे शहर- प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज नेटवर्क) आज दि.१६.०९.२०२१ मुंबई (मंत्रालय) येथे सामान्य प्रशासन विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत वाढती बेरोजगारी व महाराष्ट्र शासनात रिक्त पदांच्या भरतीसाठी चर्चा झाली. चर्चेदरम्यान शासनात तब्बल २ लाख १९३ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न पडतो. या बैठकीत रिक्त पदे प्रमुख कोणत्या कारणाने आहेत याचा आढावा घेण्यात आला:१. (Maharashtra Government) शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदोन्नतीच्या मिळून तब्बल दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिक्त जागांमध्ये जिल्हा परिषदांमधील तब्बल ४६ हजार ९६२ जागा आहेत. २. आउटसोर्सिंग, कंत्राटीवर जोर राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. नोकरी मिळत नाही म्हणून अनेकांची स्थिती बिकट झाली असून तरुण वाममार्गाला लागला आहे. असे असतानाही नव्या नोकरभरती ऐवजी शासनाचा आउटसोर्सिंग, कंत्राटी पद्धतीवर अधिक जोर दिसतो. कारण निवृत्तांना पुन्हा कंत्राटी तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जात असल्याचे दिसत आहे. ३. एमपीएससी’ची निवांत ढकल गाडी राज्य लोकसेवा आयोगाची सरळसेवा भरतीबाबतही संथगती पहायला मिळते. कॉललेटर, प्रशिक्षण, परिवीक्षाधीन कालावधी याला बराच वेळ लागतो आहे. आयोगाने २०१८ला फौजदार पदासाठी काढलेली जाहिरात. या पदासाठी २०१९ ला निवड झाली मात्र त्यानंतर दीड दोन वर्ष उलटल्यानंतर २०२१ मध्ये त्या उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठविण्यात आले आहे. ४. वर्गवारीनुसार रिक्त पदे अ वर्ग-१० हजार ५४४ ब वर्ग-२० हजार ९९९ क वर्ग-१ लाख २७ हजार ७०५ डवर्ग-४० हजार ९४४ एकूण-२ लाख १९३ त�

By राजेंद्र पाटील राऊत

Leave A Comment