Home मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वॉरंट

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वॉरंट

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0014.jpg

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वॉरंट

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

एका खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिल्याबद्दल खासदार व आमदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले.
वीज दरांमध्ये वाढ केल्याने बेस्ट महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात आंदोलनावेळी त्यांना मारहाण केल्याच्या आरोपा प्रकरणी राहुल नार्वेकर व लोढा यांच्यावर गुन्हा दाखल आहे. संबंधित प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, खटला आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे. मात्र, नार्वेकर व लोढा खटल्याला अनुपस्थित राहात असल्याने आरोप निश्चितीची प्रक्रिया खोळंबली आहे.
सर्व आरोपी गैरहजर राहिल्याने आरोपी भाजपचे आमदार आहेत की मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत, हे न्यायालय तपासू शकले नाहीत. विधानसभेच्या पुढील वेळापत्रकाबाबत बैठक सुरू असल्याने नार्वेकर विधानसभेत आहेत. त्यामुळे त्यांना १५ मिनिटे उशीर होईल, अशी माहिती शुक्रवारी नार्वेकरांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर ‘मी काय करावे, तुम्हीच सांगा. मी पुरेशी संधी दिली. त्यांना कॉल करून बोलवा, आम्ही वॉरंट रद्द करू,’ असे म्हणत न्यायालयाने नार्वेकर व लोढा यांच्यावर जामीनपात्र वॉरंट जारी केले.

Previous articleशेतजमिनीच्या ताब्यावरील वाद मिटवणारी महाराष्ट्र सरकारची सलोखा योजना काय आहे?
Next articleनवनियुक्त न्यायधीश उमाकांत शिंदे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाकडुन सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here