Home मुंबई संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

67
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220801-191337_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; सोमवार १ऑगस्ट २०२२, पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना अटक केली होती. आज ईडीने त्यांना कोर्टात सादर केले, त्या सुनावणी दरम्यान कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ३ दिवसाची कोठडी जाहीर केली. युक्तिवाद करताना संजय राऊत यांच्या वकिलांनी सांगितले की ते हृदयविकाराचे रुग्ण आहेत त्यामुळे त्यांना घरचे जेवण व औषध देण्यात यावे, अशी मागणी केली असता कोर्टाने त्यांना मुभा दिली आहे. ईडी च्या वकिलाने सांगितले की संजय राऊत यांनी दोन साक्षीदारालाही धमकी दिली आहे. चौकशीसाठी सहकार्य करत नाहीत त्यामुळे त्यांना १० दिवसाची कोठडी मागितली होती परंतु कोर्टाने त्यांना ३ दिवसाची कोठडी जाहीर केली. कोर्टाने हेही सांगितले की रावतांना भेटण्यासाठी त्यांच्या वकिलांना सकाळी८:३० ते ९:३० ही वेळ जाहीर केली आहे. रात्री १०:३० नंतर ईडी त्यांची चौकशी करू शकणार नाही असे आदेश दिले. या अटके वरती उद्धव ठाकरे खूप आक्रमण झाले व भाजप सुडाचे राजकारण करत आहे असे त्यांनी सांगितले व त्याचा तीव्र शब्दांमध्ये समाचार घेतला. हे घाणेरडे राजकारण आहे . भाजप शिवसेना संपण्याच्या मार्गावरती आहे ते मी होऊ देणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. संजय राऊत यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले. संजय राऊतांच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्यासाठी करण्यासाठी ईडीने पूर्णपणे ताकद पणाला लावणार आहे. सुनावणी दरम्यान कोर्टाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी चालू होती. संजय राऊत म्हणाले की कर नाही त्याला डर कशाला मी घाबरत नाही असे त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. मी निर्दोष आहे असे, माझे वकील कोर्टात सिद्ध करतील हे त्यांनी सांगितले.

Previous articleतांबवे इन्स्टिट्यूट चा १०० टक्के निकाल
Next articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणासाठी धर्मापुरीकर यांची अनोखी जागृती.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here