Home नांदेड स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणासाठी धर्मापुरीकर यांची अनोखी जागृती.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणासाठी धर्मापुरीकर यांची अनोखी जागृती.

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0037.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणासाठी धर्मापुरीकर यांची अनोखी जागृती.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 31 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय, स्वायत्तता संस्था, सेवाभावी संस्था यांच्या समवेत अनेक जागरूक नागरिकही आपल्या अभिनव उपक्रमातून योगदान देत आहेत. यात व्यंगचित्राचे संग्राहक व अभ्यासक मधुकर धर्मापूरीकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पर्यावरण विषयावर मोलाचा व मर्मभेदी संदेश देणाऱ्या जागतिक पातळीवरील व्यंगचित्रांचा संग्रह त्यांनी केला आहे. यातून निवडक व्यंगचित्रांना घेऊन “सांभाळू या सृष्टीला” या शिर्षकाखाली एक अभिनव प्रदर्शन त्यांनी नांदेडकरांच्या भेटीला दिले.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्यावतीने नांदेड शहरात पर्यावरण संतुलनाबाबत सुरू असलेल्या विविध उपक्रमांना धरुन आज पर्यावरण महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी हे अभिनव प्रदर्शन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह परिसरात आयोजित केले होते. याला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

एक नागरिक म्हणून प्रत्येकाच्या मनात देशाप्रती स्वाभीमान असतोच. या स्वाभिमानाला आपण ज्या भवतालात राहतो, त्या भवतालाला, पर्यावरणाला सावरून धरण्यासाठी आपल्याकडून प्रत्यक्ष कृतीचीही जोड आवश्यक असते. कोणत्याही माणसाला कृती पर्यंत पोहचविण्यासाठी खूप प्रोत्साहन द्यावे लागते. त्याच्या मनात जागृतीही करावी लागते. पर्यावरणाच्या बाबतीत जागतिक पातळीवर अतिशय सुंदर भाष्य करणारी अनेक व्यंगचित्र आहेत. त्याद्वारे पर्यावरणाच्या जागृतीचा एक विचार पोहचविण्याचा हा माझा प्रयत्न असल्याच्या भावना मधुकर धर्मापुरीकर यांनी बोलून दाखविल्या. हे प्रदर्शन हौसेपोटी जरी असले तरी ते स्वयंस्फूर्त व आपल्याकडून काही योगदान देता येईल का त्या विचारातून साकारल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवसीय असलेल्या या प्रदर्शनाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त हजेरी दिली.

Previous articleसंजय राऊत यांच्या अडचणीत वाढ
Next articleवाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या परिवाराला २५ लक्ष रुपयाची आर्थिक मदत करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here