Home नांदेड उंद्री प.दे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

उंद्री प.दे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

201

आशाताई बच्छाव

1000326269.jpg

उंद्री प.दे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
मराठवाडा विभागीय संपादक
मनोज बिरादार

नांदेड मुखेड -विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांची 133 वी जयंती उंद्री प.दे. या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचा पहिला टप्पा म्हणून पंचशील ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक उंद्री नगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती वनिता ताई गन्लेवार ग्रामसेविका कोणेरी मॅडम तसेच उपसरपंच रमाताई सोनकांबळे व बाहेरगावून आलेले प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर नगरीचे माजी नगरसेवक सुशील कुमारजी देगलूरकर, आदरणीय दिंडे मामा व त्यांचे सहकारी तसेच माधवराव पाटील गोणारे,गोपाळ पाटिल बिरादार सुधाकरराव गन्लेवार, नागनाथ गुरुजी अडवलवार,राजू पाटील सूर्यवंशी आमचे मार्गदर्शक नागेशजी कोंदापुरे सर,ज्ञानेश्वर पाटील वडजे ग्रामपंचायत सदस्य राजीव वाघमारे नागनाथ गुरूजी मारुती मामा वाघमारे यांच्यासह तसेच बौद्ध उपासक उपासिका यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल जय भीम मित्र मंडळ उंद्री प.दे. यांच्या वतीने उपस्थितांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.