Home भंडारा अखिल भारतीय धृवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांची आमरण...

अखिल भारतीय धृवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांची आमरण उपोषणास भेट

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_200956.jpg

अखिल भारतीय धृवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांची आमरण उपोषणास भेट

अजय मेश्राम यांचे २९ फेब्रुवारी पासून अन्न त्याग आंदोलन सुरू विद्युत विभागाचे दुर्लक्ष

भंडारा– आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 ला अखिल भारतीय धृवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या महावितरण कंपनी विद्युत विभागाच्या जुलमी निर्णया विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय गोपीचंद मेश्राम यांचे मागील सहा दिवसापासून अण्णत्याग आमरण उपोषण सुरू आहे .परंतु आजपर्यंत विद्युत विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही .त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये थकबाकीदारांना विद्युत बिल भरण्यास मुदत देण्यात यावी, प्रीपेड मीटर संबंधित पायाभूत सुविधा पुरविण्यात यावी ,प्रीपेड मीटर लावण्यासाठी सक्ती करू नये व तो ऐच्छिक करण्यात यावा ,शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, इत्यादी मागण्याकरता ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की ,त्यांनी तात्काळ आमरण उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्या पूर्ण कराव्यात व आमरण उपोषण मागे घ्यावे अशी मागणी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी उपोषण मंडपाला प्रत्यक्ष भेट देऊन केलेली आहे.

Previous articleफूटपाथ दुकानदार 11 मार्च पासून बेमुदत आमरण बसणार
Next articleथकबाकीदार म्हणतो माजिप्राने कनेक्शन कापले: नागरिक मधील प्रावर धडकले, पहिले मोठे मासे पकडा मग आमच्याकडे या.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here