Home भंडारा फूटपाथ दुकानदार 11 मार्च पासून बेमुदत आमरण बसणार

फूटपाथ दुकानदार 11 मार्च पासून बेमुदत आमरण बसणार

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_200548.jpg

फूटपाथ दुकानदार 11 मार्च पासून बेमुदत आमरण बसणार

निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )भंडारा शहरातील लालबहादूर शास्त्री शाळेच्या परिसरात रोडाच्या कडेला गेल्या 30 वर्षापासून चाय पाणी, भाजीपाला, चप्पल दुकान, कुशन दुकान,सायकल पंचर दुकान, हार फुल दुकान असे विविध प्रकारचे छोटे छोटे दुकाने लावून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु लालबहादूर शास्त्री शाळेचे वॉल कंपाउंड भिंत तोडून त्या ठिकाणी मोठमोठे दुकानाचे बांधकाम करून ती दुकाने लाखो रुपयांच्या भावाने श्रीमंत लोकांना विकत दिली. त्यामुळे तेथील सर्व फुटपाथ दुकानदाराना हटविण्यात आले .त्यामुळे तेथील सर्व फूटपाथ दुकानदार बेरोजगार झाले व उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली. मुला बाळांचे शिक्षण धोक्यात आले. एक महिन्यापासून रोजगार नसून अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले. शासनाला वारंवार निवेदन देऊन शासन व संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाही त्यामुळे फुटपाथ दुकानदार चंद्रशेखर खोब्रागडे, सुरेश बिरंमगडे, रवी गिरेपुंजे, शंकर बावनकुळे ,अर्चना देशकर ,राजेश गिरीपुंजे, यशवंत गिरीपुंजे, अरशद अली ,तौफिक शेख ,शुभम घडोले ,शकील शेख, रवी भजन कर विष्णू कुंभलकर विशाल साखरवाडे जयराम ठोसरे अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी निवासी जिल्हाधिकारी जे. पी. लोंढे भंडारा यांना निवेदन दिले की फुटपाथ दुकानदारांवर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली असून मुला बाळांचे शिक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे .म्हणून ज्या ठिकाणी 30 वर्षापासून दुकान होते त्या ठिकाणी दुकान लावू देण्यात यावे याकरिता दिनांक 11.03/2024 पासून लालबहादूर शास्त्री शाळेच्या वाल कंपाउंड भीतीच्या बाजूला रोडच्या कडेला बेमुदत आमरण उपोषणावर बसत असल्याबाबतचे निवेदन दिनांक 1 मार्च 2024 ला देण्यात आले .

Previous articleआमचा लढा हा भाजपच्या विरोधात आहे : वंचितचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर
Next articleअखिल भारतीय धृवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांची आमरण उपोषणास भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here