Home भंडारा आमचा लढा हा भाजपच्या विरोधात आहे : वंचितचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर

आमचा लढा हा भाजपच्या विरोधात आहे : वंचितचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_200046.jpg

आमचा लढा हा भाजपच्या विरोधात आहे : वंचितचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भाजप सरकार ही व्यापारी सरकार नफा तोटा बघणारी सरकार ज्या समूहाचा व्यवसाय होता तो त्यांच्याकडे राहणार नाही याकरिता खाजगीकरण सुरू करणे सुरू आहे. या जिल्ह्यात मासेमारीच्या व्यवसाय आहे. शंभर हजार कोटी च्या व्यवसाय होऊ शकतो परंतु आधुनिक ची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज वापरून त्या दृष्टिकोनातून एखादी कंपनी तयार करून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो परंतु याकडे शासनाचे पूर्णपणे लक्ष नाही .केंद्र सरकारचा लक्ष नसून हे भाजप करणार नाही हा धानाचा जिल्हा आहे आहे धान पडेल त्याला किंमत मिळणार नाही याबाबत सरकार धान्य विकत घेण्याचा धोरण आहे. तसेच आमच्या लढा मोदी च्या विरोधात भाजपच्या विरोधात आहे आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस एनसीपी शरद पवार सोबत युती करायला तयार आहोत. परंतु जे अडीच वर्ष चर्चा करू शकले नाही आणिआता 48 जागा सुद्धा आतापर्यंत वाटू शकले नाही आणि 12 किंवा 16 मार्चला आचारसंहिता लागू शकते किती दिवस उरले आहेत तरीपण यांच्या भांडण मिटलं नाही तर मग काय ते आम्हाला बोलवतात आम्ही जातो परंतु कॉपी पितो व वापस येतो आम्ही म्हणतो तुमच्या भांडण पहिले सोडवा नंतर तुमच्या भांडण सोडल्यावर आम्ही तुमच्यासोबत बसू आणि त्यातून काहीतरी मार्ग काढू आम्ही आम्ही तुमच्यातून बाहेर पडणार नाही तुमच्या सोबत आहे कारण की आपल्याला मोदीला हरवायचं आहे आणि संविधानाला वाचवायचे आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी बहुजन महासभा संबोधित करताना साकोली येथील वरील उद्गार काढले .याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, महाराष्ट्र पूर्व संयोजक डॉ रमेश गजबे, महाराष्ट्र सदस्य कुशल मेश्राम, पूर्व विदर्भ संयोजक अरविंद चांदेकर, आदिवासी नेते हेमराज उईके ,भटके विमुक्त नेते डॉक्टर अविनाश नान्हे,ओबीसी नेते भैय्याजी लांबट ,महाराष्ट्राचे पदाधिकारी के ए नान्हे, भंडारा गोंदिया जिल्हा निरीक्षक भगवान भोंडे,महिला निरीक्षक सुनिता टेंभुर्ण, भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, गोंदिया जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सतीश बनसोड, भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष दीपक जनबंधू, भंडारा महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, गोंदिया जिल्हाध्यक्ष महिला अध्यक्ष निशा शेंडे,भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी , सामाजिक कार्यकर्ते रोशन जांभुळकर, शब्बीर पठाण, गोंदिया राजू राहुलकर इतर मान्यवर उपस्थित होते
संचालन सुजाता वालदेकर,सुरेश खंगार ,जितेंद्र मेश्राम या तिघांनी केले तर आभार प्रदर्शन भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता युवा अध्यक्ष दीपक जंनबंधू, डी जी रंगारी , बालकदास गजभिये वैभव कावळे,अमित नागदेवे, अश्विन डोंगरे, जगदीश रंगारी, अमित नागदेवे,शितल नागदेवे, प्रशिक मोरघरे ,यादवराव गणवीर ,विनोद मेश्राम, दिलीप वानखेडे, श्रीकांत नागदेवे, ममता शामकुवर
व भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवा अध्यक्ष ,भरपूर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते जवळपास 60,000 च्या जवळपास जनसमुदाय याप्रसंगी उपस्थित होता हे विशेष

Previous articleकष्ट जिद्दीच्या जोरावर डॉ.अक्षता रेणुसे पशुवैद्यकीय अधिकारी पदी निवड
Next articleफूटपाथ दुकानदार 11 मार्च पासून बेमुदत आमरण बसणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here