Home भंडारा मअंनिसने केली मुलींच्या मनातील भूतबाधेची भीती दूर

मअंनिसने केली मुलींच्या मनातील भूतबाधेची भीती दूर

52
0

आशाताई बच्छाव

1000323087.jpg

‌ मअंनिसने केली मुलींच्या मनातील भूतबाधेची भीती दूर

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती तुमसर मार्फत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह तुमसर येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि भूत या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह तुमसरच्या गृहपाल कांता कोकाटे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमात मुलींच्या मनात भूत,प्रेत याबद्दल असलेली भीती वैज्ञानिक प्रात्यक्षिकाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रा. युवराज खोब्रागडे यांनी मुलींना मनातील भूत नावाचे भूत काढून घेण्याचे आवाहन केले. मअंनिस लाखनी तालुक्याच्या कार्याध्यक्ष अश्विनी भिवगडे यांनी भूत,प्रेत,करणी, जादूटोणा या गोष्टी अस्तित्वात नाही. त्यामुळे घाबरून न जाता सत्य,असत्याची पडताळणी करावी असे आवाहन केले.मअंनिसचे बुवाबाजी राज्य सहकार्यवाह विष्णुदास यांनी बुवाबाजी करणारे सामान्य माणसांची कशी फसवणूक करतात व समाजात अंधश्रद्धा कशी पसरवतात याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.भूत,भानामती जादूटोणा यांचे अस्तित्व सिद्ध करावे व २५ लाख रुपये मिळावे असे आवाहन विष्णुदास लोणारे यांनी केले .
या कार्यक्रमाचे संचालन पीएलव्ही आश्लेषा कुंभलकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीएलव्ही.एम एम बावनकर,नितेश बोरकर, रक्षित कांबळे,योगेश कांबळे , अवनी लोणारे व आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.

Previous articleलासलगाव येथे संगीतमय तुलसी रामायण कथा प्रारंभ
Next articleश्रीक्षेत्र किर्तांगळी येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here