Home भंडारा दाभोळकर खून प्रकरणातील तपास यंत्रणेचा अनिस कडून निषेध जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्री...

दाभोळकर खून प्रकरणातील तपास यंत्रणेचा अनिस कडून निषेध जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

113

आशाताई बच्छाव

1000371392.jpg

दाभोळकर खून प्रकरणातील तपास यंत्रणेचा अनिस कडून निषेध जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास विविध तपास यंत्रणेने केला. त्यात पाच व्यक्ती विरुद्ध आरोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा निकाल 10 वर्ष 8 महिने म्हणजे दिनांक 10/ 5 /20 24 रोजी लागला. त्यात दोन व्यक्तींना आजीवन करावासाची न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यामुळे दिलेल्या निकालाचा संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आला. मा. न्यायालयाचे अभिनंदन करण्यात आले. मात्र त्यात असलेले तीन मुख्य सूत्रधार आरोपी यांचे विरुद्ध तपास यंत्रणेनेने सबळ पुरावा न दिल्यामुळे ठोस पुराव्या अभावी त्यांची निर्दोष सुटका झाली. हे मात्र असमाधानी असून वेदनादायी व धक्कादायक बाब समोर आली आहे. म्हणून अशा तपास करणाऱ्या यंत्रणेचा म.अनिस जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने आज दिनांक 13 /5/ 2024 रोजी जिल्हाअधिक्षक रोहनी पाठराबे जिल्हा कार्यालय भंडारा मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठवून निषेध करण्यात आले. यावेळी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णूदास लोणारे उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे प्रधान सचिव प्रा. युवराज खोब्रागडे ,शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर, उपाध्यक्ष मगकबुल वारशी चंद्रशेखर खोब्रागडे हे उपस्थित होते.