Home नाशिक लासलगाव येथे संगीतमय तुलसी रामायण कथा प्रारंभ

लासलगाव येथे संगीतमय तुलसी रामायण कथा प्रारंभ

55
0

आशाताई बच्छाव

1000323036.jpg

लासलगाव येथे संगीतमय तुलसी रामायण कथा प्रारंभ

रविवार ५ मे रोजी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कथेची सांगता होणार

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

ॐ साई गणेश मित्र मंडळ नंदनगर लासलगाव यांच्या आयोजनात रविवार २८ एप्रिल पासून दररोज रात्री ८ ते ११ या वेळेत रामायणाचार्य हभप कृष्णा महाराज चाळक शिरुर पुणे या़च्या मुखारविंदातुन लासलगाव येथील नंदनगर, साईमंदिराजवळ संगीतमय तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ॐ साई गणेश मित्र मंडळ नंदनगर लासलगाव यांनी दिली आहे.
संगीतमय तुलसी रामायण कथेची रूपरेषा पुढील प्रमाणे–
रविवार २८ एप्रिल श्री राम कथा काय आहे ? गणेश वंदन, हनुमानजी वंदन, गुरु वंदना ,सती चरित्र व पार्वती जन्मोत्सव. सोमवार २९ एप्रिल श्रीराम कथा का ऐकावी? शिवपार्वती विवाह, श्रीराम अवताराचे कारण ,श्रीराम जन्मोत्सव ,मंगळवार ३० एप्रिल श्रीराम कथा काय शिकवते ?रामाची बाललीला, अहिल्या उध्दार, पुष्पवाटिकेतील श्रीराम सितेची भेट व धनुष्य भंग, बुधवार १ मे श्री रामाने धनुष्य कसे तोडले? लक्ष्मण परशुराम संवाद, श्रीरामाची वरात ,श्रीरामाचे लग्न, गुरुवार २ मे रामकथेत भोले बाबाला वंदन का? रामाचा वनवास, केवट प्रसंग ,माता शबरी ,शुक्रवार ३ मे रोजी हनुमानजीला वंदन का ? श्रीराम हनुमान भेट, हनुमान विभीषण संवाद ,हनुमान बाललीला, विभीषन शरणागती, शनिवार ४ मे राम कथेतून आपण काय शिकलात ?सेतुबंध ,लक्ष्मण मेघनाथ युद्ध, कुंभकर्ण वध ,रावण वध, रावण मंदोदरी संवाद ,श्रीराम राज्याभिषेक, रविवार ५ मे रोजी सकाळी दिंडी सोहळा ग्रंथ मिरवणूक व सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन व महाप्रसाद आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Previous articleसहकारनेते गणेशराव देशमुख यांचे निधन
Next articleमअंनिसने केली मुलींच्या मनातील भूतबाधेची भीती दूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here