Home Breaking News *शिरोळ तालुक्यात रोहीत शर्मा विरूद्ध धोनीच्या पोस्टरवरून वाद*

*शिरोळ तालुक्यात रोहीत शर्मा विरूद्ध धोनीच्या पोस्टरवरून वाद*

89
0

*शिरोळ तालुक्यात रोहीत शर्मा विरूद्ध धोनीच्या पोस्टरवरून वाद*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात महेंद्रसिंह धोनी विरुद्ध रोहित शर्मा असा वाद रंगला असून डिजिटल फलकावरुन एका चाहत्याला शेतात नेऊन बडविण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत कसलीही तक्रार वा गुन्हा दाखल झाला नसला तरी सर्वत्र याची चर्चा होऊ लागली आहे.
कोल्हापुकरांच्या हौसेला मोल नसल्याचा प्रत्यय आजपर्यंत सर्वांना दिसुन आला आहे. 15 ऑगस्टला हिंदुस्थान क्रिकेट टिमचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कोल्हापूर शहरात धोनीच्या समर्थनार्थ काही ठिकाणी चाहत्यांनी डिजिटल फलक झळकवत शुभेच्छा दिली होती. अशाच काही चाहत्यांनी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथेही धोनीचे डिजिटल फलक झळकवले होते.
दरम्यान, क्रिकेटपटू रोहित शर्मालाही राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांनीही ‘हिटमॅन’चे फलक कुरुंदवाड येथील चौकात लावले. यातून धोनी विरुद्ध शर्मा असे दोन चाहत्यांचे गट पडले होते. अशातच एका डिजिटल फलकावर ब्लेड मारल्याने, संबंधित चाहत्याने त्या ब्लेड मारणा-या अज्ञाताचा भर चौकात उद्धार केला होता. यातूनच त्या उद्धारकर्त्याला दुसऱ्या गटाच्या काही तरुणांनी शेतात नेऊन चोप दिल्याची चर्चा वा-यासारखी पसरली आहे.
हे दोन्ही फलक विना परवाना लावण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी पोलिसांत कसलीही तक्रार झाली नसल्याचेही समोर आले आहे. एकीकडे शिरोळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महापुराचे संकट घोंगावत असताना क्रिकेटपटूंच्या फलकावरून सुरू असलेल्या या डिजिटल वाॅरची चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here