• Home
  • *संघटीत कामाच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्राला लवकरात लवकर कोवीड संकरातून बाहेर काढू !* *_मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास !_*

*संघटीत कामाच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्राला लवकरात लवकर कोवीड संकरातून बाहेर काढू !* *_मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास !_*

*संघटीत कामाच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्राला लवकरात लवकर कोवीड संकरातून बाहेर काढू !*
*_मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास !_*

*कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्युज*

कल्याण – महाराष्ट्रातील जनतेने एक दिलाने आणि संघटितपणे कोडीव विरोधात युद्ध सुरु केले आहे त्या मुळे आपला महाराष्ट हा कोवीड संकरातून लवकरच मुक्त होईल असा विश्वास राज्याचे मुख्य मंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी व्यक्त केला आहे .
डोंबिवली जिमखाना, येथे कोव्हिड रुग्णांसाठी समर्पित कोविड रूग्‍णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले . या समयी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला .
गणपतीच्‍या आगमनानंतर आधीची विघ्‍ने नष्‍ट होतात, तसेच कोरोनाचे संकटही नष्‍ट व्‍हावे, ही गणराया चरणी प्रार्थना, असे उद्गार त्‍यांनी यावेळी काढले .
मुंबईत आता हायथ्रुपुट ही लॅब सुरू झाली असुन त्‍यामध्‍ये एका दिवसात 1200 टेस्‍ट होतात व कमीत कमी मानवी संपर्क राहतो, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
असिंम्‍प्टोमॅटिक पेशंटला देखील व्‍यवस्थित आयसोलेशन करणे गरजेचे आहे, कोरोनाशी लढण्‍यापेक्षा त्‍यापासून दुर राहणे आपले हाती आहे, गावागावात कोरोनाबाबत दक्षता कशी घ्‍यावी याची जनजागृती करावी, म्‍हणजे कोरोनाची काळजी करण्‍याची आवश्‍यकता नाही, असेही ते यावेळी म्‍हणाले.
कोरोनाशी लढुन हरविण्‍यापेक्षा कोरोना होणारच नाही, यासाठी शक्‍यतोवर काळजी घ्‍यावी, देशात ठाणे महापालिकेचा रिकव्‍हरी रेट 89 टक्‍के व कडोंमपाचा रिकव्‍हरी रेट 85 टक्‍के आहे, हे दिलासा दायक चिञ असल्‍याचे उद्गार उपमुख्‍यमंञी अजितदादा पवार यांनी या ऑनलाईन लोकार्पण सोहळया समयी काढले.
डोंबिवली जिमखान्‍यातील कोविड रूग्‍णालय हि एक अप्रतिम व्‍यवस्‍था असल्‍याचे प्रशंसोद्गार राज्‍याचे आरोग्‍य मंञी राजेशजी टोपे यांनी या ऑनलाईन सोहळयाचे वेळी काढले.
अतिशय कमी वेळात एमएमआर क्षेञात अनेक सुविधा कोविड साठी सुरू केल्‍या आहेत. कोविड रिकव्‍हरी मध्‍ये ठाणे महापालिकेचा राज्‍यात प्रथम असून कडोंमपा चा क्रमांक दुसरा आहे. अशी माहिती पालकमंञी एकनाथजी शिंदे यांनी यावेळी दिली.
सदर कोविड रुग्‍णालयात 70 बेड आयसीयू, 51 बेड ऑक्‍सीजन सुविधा उपलब्‍ध असणार असून त्‍यातील 03 बेड डायलिसीस रुग्‍णांकरीता राखीव ठेवण्‍यात आलेले आहेत. याव्‍यतिरिक्‍त 30 व्‍हेंटीलेटर व 40 Biapap आणि 05 High Flow Nasal Oxygen Machine सुविधा देखील उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. या रुग्‍णालयात रुग्‍णांसाठी अत्‍याधुनिक व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असून संपूर्ण रूग्‍णालय हे वातानुकुलित व इंटरनेट सुविधायुक्‍त आहे. त्‍याचप्रमाणे रुग्‍णांसाठी खास सुरेल संगीताची व्‍यवस्‍था देखील करण्‍यात आलेली आहे.
या लोकार्पण सोहळया समयी पालकमंञी एकनाथजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्‍हाण, महापौर विनिता राणे, विरोधी पक्ष नेते राहुल दामले तसेच इतर पालिका सदस्‍य, महापालिका अधिकारी/कर्मचारी , डोंबिवली जिमखान्‍याचे मोकाशी व इतर मान्‍यवर डोंबिवली जिमखाना येथे उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment