Home Breaking News *विज्ञानातील हल्दीघाटीची लढ़ाई*

*विज्ञानातील हल्दीघाटीची लढ़ाई*

127
0

*विज्ञानातील हल्दीघाटीची लढ़ाई*

*कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्युज*

आजच्या दिवशी १९९७ साली हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.आपल्या सर्वानाच हळदीचे औषधी गणुधर्म माहिती आहेत. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय, आपल्या देशात पूर्वापार वापरला जातोय. असं असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीनं *डॉ. रघुनाथ माशेलकर यांच लक्ष वेधलं.* अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. थोडक्यात अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बैचेन झाले. आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे.
यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली.इतिहासामध्ये हल्दीघाटीची लढाई प्रसिद्ध आहे. पण विज्ञान क्षेत्रात एक वेगळीच ‘हल्दीघाटी’ची लढाई प्रसिद्ध आहे. हजारो वर्षांपासून ज्या हळदीचा वापर भारतीय करत आहेत त्या हळदीवर अमेरिकेनं दावा केला होता. हळदीच्या औषधी गुणांच्या शोधाचं पेटंट अमेरिकेनं आपल्या नावावर केलं होतं. त्यांच्या या दाव्याला माशेलकरांनी आव्हान दिलं होतं. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सलग १४ महिने न्यायालयीन लढा द्यावा लागला.

हा प्रश्न फक्त हळदीचाच होता असं नाही, तर यामुळं स्वामित्व हक्क कायद्यात मोठे बदल घडले. या विजयामुळं पेटंट वर्गीकरणाच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली. या न्यायालयीन लढ्यानंतर अनेक माध्यमांनी त्यांचा गौरव ‘हल्दीघाटीचा योद्धा’ म्हणून केला होता.
आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ठ्राला भारतीय ज्ञानाचं महत्त्व कळलं आणि आपण दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. खर तर यात आपलिच चुक आहे आपन आपले ज्ञान , संस्कृती जपायला कमी पड़त आहोत , आज आपला आयुर्वेद जगभर पसरत असताना आपनच त्यचा वापर खुप कमी करतोय . म्हणून च आपन आपली संस्कृती जपली पाहीजे ..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here