• Home
  • *श्रीदेवी रुग्णालयावर महापालिकेने केली कायदेशीर कारवाई* *रुग्णालयावर प्रशासकाची नियुक्ती !*

*श्रीदेवी रुग्णालयावर महापालिकेने केली कायदेशीर कारवाई* *रुग्णालयावर प्रशासकाची नियुक्ती !*

*श्रीदेवी रुग्णालयावर महापालिकेने केली कायदेशीर कारवाई*
*रुग्णालयावर प्रशासकाची नियुक्ती !*

*कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्युज*

कल्याण – शासनाने निर्धारित केलेल्‍या दरापेक्षा अवाजवी दराने बिलांची आकारणी केल्‍यामुळे तसेच इतर काही आक्षेपार्ह बाबी महापालिकेच्‍या भरारी पथकास आढळून आल्‍याने श्रीदेवी रुग्‍णालय, कल्‍याण(प) यांच्‍यावर कारवाई का करण्‍यात येवू नये व त्‍याचा महापालिकेच्‍या दप्‍तरी असलेला नोंदणी परवाना का रद्द करु नये, अशी नोटीस श्रीदेवी रुग्‍णालयास यापूर्वीच बजावण्‍यात आली होती.
श्रीदेवी रुग्‍णालयाने त्‍यांचा रुग्‍णालयातील24 बेडवर माहे जुलै पासून कोविड रुग्‍णांवर उपचार होत असूनही महापालिकेस याबाबत कळविले नव्‍हते. त्याचप्रमाणे महापालिकेने दिलेल्या नोटीसावर रुग्णालयाने केलेला खुलासा पाहीला असता नोटीसीत नमुद बाबींचा खुलासा न करता शासन दरापेक्षा जादा दराने आकारणी केल्याबाबतचे समर्थन केल्याचे दिसून आले. श्रीदेवी रुग्णालयात शासनाने दिलेल्या दरापेक्षा जादा आकारणी करुन जास्त रक्कमेचे बिल रुग्णाला देणे, 80 टक्के व 20 टक्के बेडचे स्वतंत्र नोंद न ठेवणे व रुग्णांस त्याविषयी माहिती न देणे, महापालिकेच्या भरारी पथकास सर्व बिले तपासणीसाठी उपलब्ध करुन न देणे, लेखा परिक्षकांस असहकार्य करणे व उध्दट वर्तन करणे इत्यादी बाबी पाहता सदर रुग्णालयाने शासनाने व महापालिकेने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यामुळे मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 नुसार देण्यात आलेली रुग्णालय नोंदणी दि. 31 ऑगस्ट 2020 किंवा उपरोक्त अनियमितता दूर करुन रक्कम परत करणे यापैकी जे नंतर घडेल तोपर्यंत निलंबित करण्याचा आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, यांनी निर्गमित केले आहे.
सदर रुग्णालयामध्ये ओपीडिद्वारे हिमोडायलेसिस करण्यास परवानगी राहील परंतु कोणत्याही प्रकारचे नविन रुग्ण उपचारासाठी दाखल करुन घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच सदर आदेशाचे पालन करुन घेणे व सदर रुग्णालयात आज रोजी दाखल असलेल्या कोव्हिडग्रस्त रुग्णांवर शासनाच्या आदेशानुसार समाधानकारक औषधोपचार होईल व त्यांच्याकडून शासकीय दराने बिलाची आकारणी केली जाईल, हे निश्चित करण्याकरीता व रुग्णालयातील सर्व रुग्ण डिसचार्ज होईपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने समिर सरवणकर, वैद्यकीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याच रुग्णालयाने एका डिचार्ज रुग्णाला अनावश्यक बिल दिले होते याचा जाब विचारत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी स्वःता पी पी इ कीट घालुन कोरोना मुक्त झालेल्या महिला रुग्णाला रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उचलून आणून घरी पाठवून दिले होते व या गैर प्रकाराची तक्रार पालिका आयुक्तां सह पालक मंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कडे केली होती .

anews Banner

Leave A Comment