• Home
  • 🛑 दाऊद, हाफिज, मसुदच्या आर्थिक नाड्या आवळणार 🛑

🛑 दाऊद, हाफिज, मसुदच्या आर्थिक नाड्या आवळणार 🛑

🛑 दाऊद, हाफिज, मसुदच्या आर्थिक नाड्या आवळणार 🛑
✍️ इस्लामाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

इस्लामाबाद -⭕पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटना, त्यांचे प्रमुख आणि गुन्हेगारांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि जैश-ए-महंमदचा प्रमुख मसुद अजहर यांच्या सर्व मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. त्यांची बॅंक खाती गोठवण्याची कारवाईही होणार आहे.

फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या आंतरराष्ट्रीय यंत्रणेच्या धसक्यामुळे पाकिस्तानने आर्थिक निर्बंधांचे पाऊल उचलले आहे. पॅरिसस्थित एफएटीएफ दहशतवादासाठी पुरवला जाणारा निधी (टेरर फंडिंग) आणि मनी लॉण्डरिंग रोखण्यासाठी सक्रिय आहे. त्या यंत्रणेने याआधीच पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे.

दहशतवादी संघटनांवर ठोस कारवाई केली नाही तर त्या यंत्रणेकडून काळ्या यादीत टाकला जाण्याचा धोका पाकिस्तानपुढे आहे.

तसे झाल्यास पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरून आर्थिक मदत मिळणे बंद होईल. त्या शक्यतेमुळे तंतरलेल्या पाकिस्तानने दहशतवादी संघटना आणि गुन्हेगारांविरोधात आर्थिक निर्बंधांचे पाऊल उचलले आहे.

भारतीय तपास आणि सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी दाऊदने पाकिस्तानात आश्रय घेतला आहे.

त्याचे पाकिस्तानात अवैध व्यवसायांचे मोठे जाळे असल्याचे समजते. हाफिज हा मुंबईत 2008 मध्ये झालेल्या महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांचा (26/11) सूत्रधार आहे. मसुदची संघटना जैशही सातत्याने भारतविरोधी कारवाया करत असते….⭕

anews Banner

Leave A Comment