Home पुणे कात्रज नवा बोगदा ते नवले पूल आणि परिसरातील अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांचा अहवाल...

कात्रज नवा बोगदा ते नवले पूल आणि परिसरातील अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांचा अहवाल आठवडाभरात… !

213
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कात्रज नवा बोगदा ते नवले पूल आणि परिसरातील अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांचा अहवाल आठवडाभरात… ! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :-⭕ कात्रज – नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठीच्या नजीकच्या काळातील आणि दीर्घकालीन उपाययोजनांसंदर्भात आज महापालिका प्रशासन, पोलीस अधिकारी, महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासमवेत महत्त्वाची बैठक घेतली.

यात तीव्र उतार कमी करणे, सीसीटीव्ही बसवणे, लेन कटिंगवर कारवाई करणे, जोड रस्ते कमी करणे, सर्व्हिस रोडमध्ये सलगता आणणे, आवश्यकता भासल्यास पुलाची/ग्रेड सेपरेटर यासह विविध बाबींवर चर्चा झाली. शिवाय याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी तज्ञांकडून सर्वंकष आढावा घेऊन येत्या आठवड्याभरात सविस्तर अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला असून सदर अहवाल केंद्रीय दळण-वळण मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन देण्यात येणार आहे.

उपमहापौर सुनीताताई वाडेकर, पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, विरोधी पक्ष नेत्या दीपालीताई धुमाळ, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. सुहास चिटणीस, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभाग प्रमुख श्रीनिवास बोनाला, पोलीस वाहतूक उपायुक्त डॉ. राहुल श्रीरामे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.⭕

Previous articleबाहेर पडल्यावर तुम्हाला मदत करणार..! जामीनावर सुटल्यानंतर जेलमधील सहकारी कैद्यांना आर्यनचे वचन
Next articleसाप्ताहिक कोल्हापूर विशेष ” दिवाळी अंकाचे युवा मराठा न्युज मुंबई कार्यालयात प्रकाशन सोहळा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here