Home मुंबई बाहेर पडल्यावर तुम्हाला मदत करणार..! जामीनावर सुटल्यानंतर जेलमधील सहकारी कैद्यांना आर्यनचे वचन

बाहेर पडल्यावर तुम्हाला मदत करणार..! जामीनावर सुटल्यानंतर जेलमधील सहकारी कैद्यांना आर्यनचे वचन

152
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 बाहेर पडल्यावर तुम्हाला मदत करणार..! जामीनावर सुटल्यानंतर जेलमधील सहकारी कैद्यांना आर्यनचे वचन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :-⭕बॉलिवूड अभिनेता ‘शाहरुख खान’ आणि ‘गौरी खान’ यांचा मुलगा ‘आर्यन खानला’ जामीन मिळाला आहे. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचा यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानला आजची रात्र तुरुंगातचं काढावी लागणार आहे.

संध्याकाळी ६ वाजता आर्यन खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती..?
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानने त्याच्या बॅरेकमधील काही कैद्यांशी ओळख केली होती. आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी कळताच तो त्या कैद्यांकडे गेला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आणि चालू असणाऱ्या प्रकरणांमध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले.

आर्यनच्या जामीन अर्जावर सलग तीन दिवस सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला जामीन देण्याचा निर्णय घेतला.कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच आर्यन, अरबाज, मुनमुन तुरुंगातून बाहेर पडू शकणार आहेत. तिघेही शुक्रवारी किंवा शनिवारी तुरुंगातून सुटू शकतील. आर्यन खानच्या वकिलांना तीन प्रयत्नांनंतर स्टार किड ला जामीन मिळवून देण्यात यश आले आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज दोनदा फेटाळला होता.

आर्यन खानच्या घरी येण्यापूर्वी फुलांची सजावट केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय शाहरुख खानच्या घराबाहेर अनेक चाहते जमा झाले आहेत. फटाके वाजवून आणि पोस्टर लावून ते आनंद साजरा करत आहे.

सोशल मीडियावर अबराम खानचे फोटोही समोर आले आहेत, ज्यात तो बाल्कनीत हात हलवून चाहत्यांचे स्वागत करताना दिसत आहे. ⭕

Previous articleआर्यनची सुटका नाहीच..? जामीनाविरोधात एनसीबी सर्वोच्च न्यायालयात जाणार..! उज्ज्वल निकम 🛑
Next articleकात्रज नवा बोगदा ते नवले पूल आणि परिसरातील अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांचा अहवाल आठवडाभरात… !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here